
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण हे 2018 साली घडलेले आहे आणि त्यावेळेस राज्यात भाजपचे सरकार होते व देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व गृहमंत्री होते. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेस या का कारवाई केली नाही म्हणून देवेंद्र फडणवीस यांची देखील या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. अन्वय नाईक यांच्या पत्नी व मुलीला धमकीचे पह्न यायचे ते कोण करायचे? पह्न करणारे भाजपचे गुंड होते का? याची देखील संपूर्ण चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी केली.
गुरुवारी मुंबई काँग्रेसतर्फे एकनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील आझाद मैदान जवळील, राजीव गांधी भवन, मुंबई काँग्रेस कार्यालय येथे ‘महिला व मागासवर्गीयांवर होणाऱया अत्याचाराविरोधात जनजागरण अभियान’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
एकनाथ गायकवाड पुढे म्हणाले की, अर्णब गोस्वामी यांना ते पत्रकार आहेत म्हणून अटक झालेली नाही तर त्यांना अटक अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक झालेली आहे हे या भाजपच्या लोकांना कळत नाही का? अमित शाहपासून सगळेच खालपर्यंत ते किरीट सोमय्या नाही ती चुकीची प्रतिक्रिया देत सुटलेले आहेत. किरीट सोमय्यांसारखे लोक तर अलिबागपर्यंत पोहचले. काय चाललंय काय या भाजपचे? अर्णब गोस्वामी यांनी जर गुन्हा केला असेल तर शिक्षा ही व्हायलाच हवी.






























































