
अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाला मार्केट सुरू केल्यानंतर ग्राहकांच्या बेशिस्तीमुळे पहिल्याच दिवशी बोजवारा उडालेला आहे . 500 हून जास्त गाड्या मार्केटमध्ये दाखल होताच त्याहून जास्त ग्राहकांची झुंबड उडाली. त्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास बाजार समिती प्रशासन अपुरे पडले असल्याचे चित्र बाजार समितीमध्ये होते . बाजार समितीमधून माल थेट किरकोळ व्यापा-यांकडे जाण्याचे नियोजन होते परंतु गर्दीने तेही पुरते कोलमडून पडले , सामान्य नागरिकांना मार्केटमध्ये प्रवेश निषिद्ध असतानाही मोठ्या संख्येने ग्राहकांनी भाज्या घेण्यासाठी गर्दी केली.
सोशल डिस्टन्स कुठेही पाळला जात नसल्याने व्यापारी आणि माथाडी वर्गात भीतीचे वातावरण होते. यामुळे व्यापा-यांनी पुन्हा मार्केट बंदचा इशारा दिला आहे.





























































