आयफोन चालता–बोलता होणार चार्ज

अॅपल कंपनी नव्या आयफोनसाठी मॅग्नेटिकली अटॅच बॅटरी पॅकवर काम करत आहे. यामुळे वायरलेस पद्धतीने म्हणजेच कोणत्याही प्लगशिवाय अॅपलचे आयफोन चार्ज होऊ शकणार आहेत. अगदी सहज चालताबोलता फोन चार्ज होणार आहे.

गेल्या वर्षभरापासून अॅपल कंपनी वायरलेस चार्जिंगवर काम करत आहे. येत्या काही महिन्यांत वायरलेस चार्जिंग अॅक्सेसरी उपलब्ध होऊ शकणार आहे. बॅटरी पॅक हा आयफोन 12च्या मागे जोडलेला असेल. बॅटरी पॅकच्या प्रोटोटाईपमध्ये एक सफेद रबर बाहेरच्या बाजूला असेल, असं समजतंय.

ओव्हरहिटिंगची समस्या

अंतर्गत चाचणीमध्ये मॅग्नेटिक अटॅचमेंट सिस्टिम ही चार्जिंगमध्ये खूप चांगली असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र सॉफ्टवेअर आणि पॅक ओव्हरहिटिंगसारख्या मुद्दय़ांवर कमी पडतेय. त्यामुळे या अॅक्सेसरीला थोडा विलंब लागत आहे. अद्याप अॅपल पंपनीकडून अधिकृत काहीच सांगण्यात आलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या