अर्जुन कपूर प्लाझ्मा दान करणार

.

कोरोनाची लागण झालेला अभिनेता अर्जुन कपूर कोरोनामुक्त झाल्यानंतर प्लाझ्मा दान करणार आहे. आपण 45 दिवसांनंतर मुंबईच्या सिटी हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा दान करणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे.

मिशन बिगिन अंतर्गत लॉकडाऊन खुले झाल्यानंतर चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे. मात्र चित्रीकरण करतानाच अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याच्यासोबत काम करणाऱया दोन अभिनेत्रींना 6 सप्टेंबर रोजी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. मात्र अर्जुन कपूरला कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने तो होमक्वारेंटाईन आहे. सध्या त्याची प्रकृतीही ठणठणीत आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर प्लाझ्मा दान केल्यास कोणाचा तरी जीव वाचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सामाजिक भान जपण्यासाठी कोरोनामुक्त झालेल्या जास्तीत जास्त जणांनी प्लाझ्मा दान करावे असे आवाहनही अर्जुन कपूर याने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या