जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केली एका जवानाची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । जम्मू

जम्मू कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील दहशतवाद्यांनी एका 25 वर्षीय जवानाची त्याच्या घराबाहेर हत्या केल्याचे समोर आले आहे. अशिक अहमद नायक उर्फ आसिक हुसेन असे त्या जवानाचे नाव असून तो पुलवामातील पिंगलीना गावात राहायचा. याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी स्थानिक वृत्तवाहिन्यांनी हत्या करण्यात आलेला तरुण हा लष्कराचा जवान असल्याचे म्हटले आहे. या हत्येनंतर लष्कराने व स्थानिक पोलिसांनी या भागात शोध मोहीम सुरू केली आहे.

अशिक अहमद नायक हा काही दिवसांपूर्वीच लष्करात भरती झाला होता. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास एका बुरखाधारी दहशतवाद्याने अशिकवर त्याच्या घराबाहेर गोळ्या झाडल्या. त्यानंतर तो दहशतवादी तेथून फरार झाला. त्यानंतर अशिकला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.