संरक्षण मंत्र्यांसोबतच्या फोटोतली ती मुलगी कोण? जाणून घ्या सत्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गेल्या काही दिवसांपासून संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांचा एका लष्करातील महिला अधिकारीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोसोबत ती महिला अधिकारी ही सितारामन यांची मुलगी असल्याचे देखील सांगितले जात आहे. मात्र या फोटो मागचे सत्य बाहेर आले असून फोटोतली ती महिला अधिकारी ही सितारामन यांची मुलगी नसल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

27 डिसेंबरला ‘ टीम मोदी सपोर्टर जालोर’ या पेजवरून संरक्षण मंत्री सितारामन यांचा महिला अधिकारीसोबतचा फोटो सर्वप्रथम शेअर करण्यात आला होता. सोबत ती अधिकारी सितारामन यांची मुलगी असल्याचे म्हटले होते. त्यानंतर काही वेळातच ही पोस्ट व्हायरल झाली व अनेकांनी ती शेअर केली. दरम्यान संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा फोटो शेअर करण्यात आला असून सोबत ती अधिकारी निर्मला सितारामन यांची मुलगी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या फोटोमधील महिला अधिकारीचे नाव निकीता वीरैया असून ती दोन वर्षापूर्वी हिंदुस्थानी लष्करात भरती झाली आहे. तर निर्मला सितारामन यांच्या मुलीचे नाव पराकाला वाङ्मयी असून तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पीएचडी केलेली आहे.