
सामना ऑनलाईन । सांगली
कोल्हापूर आणि सांगलीमध्ये गेल्या आठवड्याभरापासून पूरस्थिती गंभीर आहे. लष्कराचे जवान, एनडीआरएफचे पथकं, सरकार आणि स्थानिक संस्था पुराच्या पाण्यात उतरून मदत करत आहे. सांगलीतील सांगलीवाडी येथील एका मातेला आणि तिच्या 3 महिन्यांच्या बाळाला लष्कराच्या जवानांनी वाचवले. यानंतर या मातेने अंत्यंत बोलकी प्रतिक्रिया देत लष्करी जवान आणि सरकारचे आभार मानले.
मिथिला सतीश कुंभार असे या मातेचे नाव आहे. तीन महिन्यांच्या लहान बाळासह महिला व कुटुंबाला आर्मीच्या पथकाने सुखरूप बाहेर काढले. सांगलीवाडी येथील या मातेने प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘आमच्या घरात आठ मोठी माणसं आणि चार लहान मुलं आहेत. पुरातून बाहेर पडण्यासाठी लष्कराने आणि महाराष्ट्र शासनाने मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार.’ याचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.



























































