अर्णब गोस्वामींना हक्कभंगाची 60 पानांची नोटीस

रिपब्लिक टीव्हीचा मालक, संपादक अर्णब गोस्वामी यांना विधीमंडळाने विशेषाधिकार भंगाची नोटीस बजावली आहे. विधिमंडळाने त्यांना साठ पानांची नोटीस बजावली आहे. अर्णब गोस्वामी यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

रिपब्लिक टीव्हीचा मालक, संपादक अर्णब गोस्वामी यांनी आपल्या टीव्ही शोदरम्यान मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सदस्य तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केला आहे. महाराष्ट्राच्या सार्वभौम सभागृहातील सदस्यांचा हा अवमान म्हणजे राज्यातील तमाम जनतेचा अवमान असून अशा सुपारीबाज, टिनपाट पत्रकाराविरोधात हक्कभंग दाखल करा अशी मागणी करणारा प्रस्ताव शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत मांडला होता. तर विधान परिषदेत भाई जगताप आणि मनीषा कायंदे यांनी अर्णब गोस्वामीच्या हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला होता. . दोन्ही सभागृहांत हे प्रस्ताव स्वीकारण्यात आले होते. यावर कार्यवाही करून निर्णय घेऊ असे आश्वासन उपाध्यक्ष व उपसभापती यांनी दिले. त्यानुसार विधीमंडळाने अर्णब गोस्वामी यांना नोटीस बजावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या