किस्से आणि बरंच काही- द वॉल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> धनंजय साठे

भिंतीच्या पलीकडे काय चाललंय हे आपल्याला दिसत नाही. म्हणून भिंतीची दुसरी बाजू पाहायचा, समजून घ्यायचा आज मी प्रयत्न करणार आहे. अशी भिंत जिची प्रत्येक वीट ही अफाट परिश्रम, कठोर मेहनत, प्रचंड जिद्द, चिकाटी, शिस्त आणि नैसर्गिक गुणांच्या बळावर रचली गेली आहे. इंग्रजीत भिंत म्हणजे वॉल! हिंदुस्थानी क्रिकेट आणि जगभरातून संबोधली जाणारी एकमेव वॉल म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका आणि गुणी क्रिकेटर राहुल द्रविड !

हा राहुल द्रविड म्हणजे मितभाषी आणि पुढे पुढे न करणारा एक संत प्रवृत्तीचा माणूस. कुवत असूनही त्याच्या वाटय़ाला यायला हवी तशी स्टार व्हॅल्यू कधीच आली नाही, पण मुळातच राहुलची तशी प्रवृत्तीही कधीच नव्हती. म्हणूनच कदाचित त्याच्याक्रिकेट कारकीर्दीतसुद्धा तो यष्टिरक्षक आणि उत्तम स्लिप फिल्डरच राहिला. यष्टीच्या मागे उभं राहून तो नावारूपाला आला, पण एक फलंदाज म्हणून जगातल्या सर्वात वेगवान गोलंदाजांचा सामना करताना नेमक्या ठिकाणी त्याचं पाऊल पुढे पडायचं आणि तो भन्नाट कव्हर ड्राईव्हज् मारायचा. लाडाने एखाद्याला हळूच चापटी मारावी तसे त्याचे स्क्वेअर कट्स असायचे. अहाहा… फक्त आणि फक्त राहुल द्रविडच तसे मारू जाणे.

तर मी आणि राहुल द्रविड… दोघेही मराठी कुटुंबातले, बंगळुरूमध्ये लहानाचे मोठे झालो. एकाचक्रिकेट क्लबसाठीक्रिकेट खेळलो. हो हो, बरोबर वाचताय! मी चक्क ‘द वॉल’ला गोलंदाजी करायचो सराव करताना. त्यासाठी मी स्वतला आज भाग्यवान समजतो. तर हे घडलं कसं? यामागे एक गोड इतिहास आहे. तेव्हा मी बंगळुरूचा सर्वात प्रतिष्ठितक्रिकेट क्लब BUCC मध्ये (बंगलोर युनायटेडक्रिकेट क्लब) खेळायचो. त्या काळात राहुलचे बाबा श्री. शरद द्रविड हे जाम बनवणाऱया प्रसिद्ध किसान इंडस्ट्रीजमध्ये एका उच्च पदावर कार्यरत होते. मी तेव्हा कॉलेजमध्ये शिकत होतो. साठे आणि द्रविड… दोन्ही कुटुंबे तेव्हा बंगळुरूच्या महाराष्ट्र मंडळाची सदस्य होती. पुढे जाऊन मी महाराष्ट्र मंडळाचा सचिव झालो आणि द्रविड काका ाढाrडा विभागाचे सचिव झाले. तर त्या रात्री द्रविड काकांचा मला फोन आला. ते म्हणाले, “तू ज्या क्लबसाठी खेळतोस तिथे राहुलला खेळता येईल का?” मी तेव्हा त्या क्लबमध्ये माजीक्रिकेटर पॉली उम्रीगर यांच्या शिफारसीवर खेळत होतो. उम्रीगरांनी मला शिवाजी पार्कवर खेळताना पाहिलं होतं. त्यांच्या म्हणण्यामुळे आणि त्यांनी दिलेल्या पत्राद्वारे मी केकी तारपोर यांच्या BUCC क्लबमध्ये खेळायला लागलो होतो. BUCC मध्ये तेव्हा रेफरन्सशिवाय शिरकाव नव्हता. त्या रात्री फोनवर मी द्रविड काकांना सांगितलं की, सकाळी सरावाला गेल्यावर केकी सरांशी बोलून बघतो. तेव्हा राहुल अवघा 11-12 वर्षांचा होता.

दुसऱया दिवशी ठरल्याप्रमाणे मी केकी सरांना राहुलबद्दल सांगितलं. आमचे घरचे संबंध आहेत आणि आम्ही महाराष्ट्र मंडळाचे सदस्य पण आहोत हेही सांगितलं. सर म्हणाले, “बोलाव उद्या त्याला… मला बघू दे एकदा.” त्याच्या दुसऱया दिवशी राहुल आला. सरांनी त्याला लांब एका कोपऱयात क्षेत्ररक्षणासाठी उभं केलं होतं. मग तो क्षण आला. राहुलला फलंदाजीच्या सरावासाठी पॅडअप व्हायला सांगण्यात आलं. त्या दिवशी मी राहुलला माझे पॅड्स दिले होते. आठवल्यावर आज अंगावर रोमांच उभे राहतात की, एका जगविख्यात फलंदाजाने माझे पॅड्स वापरले होते. त्या दिवशी केकी सरांनी सर्व वेगवान गोलंदाजांना विश्रांती दिली आणि मध्यमगती आणि फिरकी गोलंदाजांना (ज्यात मीसुद्धा होतो) गोलंदाजी करायला सांगितली. “तो लहान आहे, सांभाळून बॉल टाका” असं सरांनी मध्यमगती गोलंदाजांना सांगितलं. त्या वेळी बंगळुरूमध्ये सगळे सराव हे मॅटिंगवर व्हायचे. मॅटवर चेंडू थोडा अधिक स्किड होऊन अधिक वेगाने फलंदाजापर्यंत पोहोचतो. तेव्हा आमचा सराव चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर मॅटिंग विकेट्सवर व्हायचा. याच मॅटिंग विकेट्सवर राहुल खेळत वाढल्यामुळे नंतर तो तंत्रशुद्ध खेळासाठी आणि बचावासाठी (dािहा) खूप प्रसिद्ध झाला.

नुकतीच मी पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तरची मुलाखत पहिली. ज्यात त्याला विचारण्यात आलं की, त्याच्या कारकीर्दीत त्याने पाहिलेला आणि विरुद्ध खेळलेला, ज्याला बाद करणं सर्वात कठीण असा फलंदाज कोण? तर शोएब म्हणाला, ‘मी खूप मोठय़ा ‘बाप’ फलंदाजांबरोबर आणि विरुद्ध खेळलो आहे. पण राहुल द्रविडसारखा तंत्रशुद्ध खेळणारा फलंदाज मी पाहिलेला नाही. त्याची बॅट ही ढालीसारखी वाटायची. त्याला आऊट करताना आम्हा गोलंदाजांना अक्षरश रडू यायचं.’ सुनील गावसकरांना आपला आदर्श मानणाऱया द्रविडचं तंत्रशुद्ध फलंदाजीच्या यशाचं हेच गमक असावं.
सेंट जोसेफ, बंगळुरूमधून राहुल पदवीधर झाला. एमबीएचं शिक्षण सुरू असताना त्याला कर्नाटकतर्फे रणजी ट्रॉफी आणि पुढे दुलीप ट्रॉफीच्या चमूत स्थान मिळालं. जून 1996च्या इंग्लंड दौऱयात आपल्या टेस्ट पदार्पणातच 95 धावांवर तो बाद झाला होता. शालेय जीवनापासून अंडर 12, अंडर 15, अंडर 17 आणि अंडर 19… प्रत्येक पायरीवर आपला ठसा उमटवत कुठेही शॉर्टकट न घेता राहुल देशाची शान बनला.

अतिशय शांत स्वभावाचा, मनमिळाऊ व्यक्तिमत्त्वाचा, नेहमी कुटुंबाला महत्त्व देणारा… या भल्या माणसाचे असंख्य चाहते जगभरात असणार यात काही आश्चर्य वाटायला नको.

त्याचा एक मजेशीर किस्सा आठवतो. त्या वेळी राहुल नावारूपाला येत होता. टूरवरून परतण्याच्या एक दिवस आधी एक तरुणी इंदिरानगर बंगळुरू इथल्या द्रविडच्या राहत्या घरी आली. आपल्या मुलाची चाहती आहे अशी ओळख तिने द्रविड काका-काकूंना करून दिली. मला तुमच्या मुलाशी लग्न करायचं आहे असा हट्ट धरला. त्या वेळी राहुल अविवाहित होता. ती घरून पळून आलेली होती. द्रविड काका-काकूंनी तिची व्यवस्था त्यांच्याच घरात केली. दुसऱया दिवशी राहुल घरी पोहोचल्यावर त्याला धक्काच बसला. प्रकरण समजल्यावर त्याने त्या तरुणीला समजावून तिच्या घरी सन्मानाने पोहोचतं केलं आणि आपल्या भोळ्या आईबाबांना समजावलं की, चाहते वाढत चालले आहेत. कुणालाही घरात घेऊ नका. इतकं साधं कुटुंब आहे राहुल द्रविडचं.

राहुलचेक्रिकेट जगतातले पराम सगळ्यांना सुपरिचित आहेत. फक्त एकच गालबोट म्हणावं असं लागलं होतं. किंबहुना लावलं गेलं होतं. 2004 च्या पाकिस्तान दौऱयावर सचिन तेंडुलकर 194 धावांवर फलंदाजी करत असताना कर्णधार राहुल द्रविडने डाव घोषित केला होता. त्या वेळेला वृत्तपत्र व टेलिव्हिजन वाहिन्यांनी तेंडुलकर-द्रविडमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या लावून धरल्या होत्या, पण तेंडुलकर आणि द्रविडने या बातम्यांना विशेष महत्त्व कधीच दिलं नव्हतं. राहुलला त्याचे हिंदुस्थानी व अन्य चाहते ‘जॅमी’ या नावाने संबोधित करतात. वडील ‘किसान जॅम’ या कंपनीत नोकरीला असल्याकारणाने त्याला हे नाव पडलं. बायकोचा वाढदिवस लक्षात राहावा म्हणून तिची जन्मतारीख ‘19’ या नंबरची जर्सी घालून तोक्रिकेट खेळला आहे. राहुलची पत्नी डॉ. विजेता हिची पार्टनरशिप सर्वात महत्त्वाची. त्याला दोन मुले. मोठा समित हा कर्नाटकतर्फे ‘अंडर 19’ खेळत आहे आणि धाकटा अन्वय शिक्षण घेत आहे.

आज अर्जुन अवॉर्ड, पद्मश्री, पद्मभूषण, घ्ण्ण् हॉल ऑफ फेम, सर्वाधिक चेंडूंचा सामना केलेला फलंदाज… असे अनेक पाम त्याच्या नावावर आहेत. दहा वर्षांचा मी पाहिलेला राहुल ते हिंदुस्थानी चमूचा हेड कोचपर्यंतचा त्याचा प्रवास इथे मांडण्याचा हा केलेला एक छोटासा प्रयत्न.
 [email protected]
(लेखक क्रिएटिव्ह हेड, अभिनेते आणि गायक आहेत.)