
>> डॉ. युगंधरा रणदिवे
कथा-कादंबऱयांतून स्त्राrला कितीही नाजूक, कोमल दाखवले असले तरी स्त्राrच्या अंगी प्रचंड शक्ती आहे. ती धैर्यवान आहे, समजूतदार आहे. ती आई म्हणून प्रेमळ असली तरी ती कोणतीही वाईट गोष्ट खपवून घेणार नाही. ती आज्ञाधारक असली तरी वेळ आली तर भल्याभल्यांना आपल्या पायाशी लोळण घ्यायला लावेल. ती त्यागाची परिसीमा गाठू शकत असली तरी हक्कासाठी लढणे हा तिचा बाणा आहे. ती मुलांबरोबर लहान होते, नवऱयाबरोबर प्रेमिका होते, वृद्धांची सेवा करताना परिचारिका होते, बाहेरच्या जगात उत्तम काम करते आणि हे सगळे रोल एकाच दिवसात वेगवेगळय़ा वेळी ती जराही न गोंधळता मोठय़ा सहजतेने करते.
यासाठी तिच्याकडे असते प्रेम, सहनशीलता, दयाभाव, समजूतदारपणा आणि कॉम्प्युटरपेक्षाही वेगाने कामाची आखणी करणारा मेंदू! तिची इच्छाशक्ती तिच्या शरीराच्या ताकदीपेक्षाही बलवान असते. तिला कुठलेच क्षेत्र वर्ज्य नाही. तिच्या असण्याने चैतन्य असते. ती प्रेरणा देते, आधार देते, कानउघाडणी करते आणि हो, समर्पण पण करते. ‘ती’ ला समजणे तसे सोपे नाही आणि तिचा तो अट्टहासही नाही. तिचे सामान्यतले असामान्यपण दिसते, पण वाखाणले कमी जाते. देवी, मूर्ती वा फोटोत न शोधता घरातल्या गृहिणीत ‘देवत्व’ जेव्हा जाणवेल तेव्हा खऱया अर्थाने नवरात्र साजरी झाली असे म्हणता येईल.


























































