
>> गिरीश राऊत
विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भेद ओळखला पाहिजे. विज्ञान आणि अध्यात्म एक होऊन हिंदुस्थानी कृषियुगातील वा जंगलाबरोबर जगण्याची ऊर्जाविरहित पद्धत ताबडतोब स्वीकारली तरच मानवजात व जीवसृष्टीचे रक्षण होऊ शकते. अर्थात औद्योगिकीकरण, शहरीकरण व अर्थव्यवस्था यांना स्थान नसावे. तंत्रज्ञान व पैसा हा प्रश्न सोडवू शकणार नाही. सध्याची प्रभावशाली माणसे एका भ्रमात असल्याने या दिशेने प्रयत्न करतील अशी शक्यता कमी आहे.
अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटीक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांनी पॅरिस करारातून अमेरिका बाहेर पडल्याबद्दल ट्रम्प यांच्यावर टीका केली. त्यावर उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, आम्ही पर्यावरणासाठी नोकऱया गमावू इच्छित नाही. त्यांनी जबाबदारी झटपून चीन, रशिया व हिंदुस्थानला दोष दिला.
‘पर्यावरण’ या शब्दातून खरे गांभीर्य व्यक्त होत नाही. सुमारे वीस वर्षांपूर्वी अल गोर व ज्युनिअर बुश यांच्या लढतीतही बुश यांनी हेच शब्द वापरले होते. प्रकल्प आणून नोकऱया देतो, विकास करतो असे म्हणणाऱया जगभरातील ट्रम्पसारख्या नेत्यांना वास्तवात कोणत्याही क्षेत्राचे खरे ज्ञान नसते. त्या क्षेत्रातील तज्ञ म्हणविणाऱयांनाही ते नसते. जगात औद्योगिकीकरण ही प्रक्रिया प्रगतीचा शिक्का मारून चालू आहे. त्यातील हे छापील तज्ञ आहेत.
औद्योगिकीकरणासाठीच निर्माण झालेल्या विद्यापीठांनी घडवलेले. पर्यावरणाचे रक्षण म्हणजे मानवजात, जीवसृष्टी व तिला जन्म देणाऱया पृथ्वीच्या जडणघडणीचे रक्षण, हा अर्थ कळला तर पुणी असे म्हणेल काय की, मानवजातीच्या रक्षणासाठी आम्ही नोकऱयांचा त्याग करू शकत नाही. त्या गमावू शकत नाही. मग हे वाक्य विचित्र व हास्यास्पद वाटेल. पण ते तसे आधुनिक जगाला वाटत नाही, कारण प्रश्न कोणत्या थराला गेला आहे हे माहीत नाही.
‘पर्यावरणाचे रक्षण’ हे पूर्वीदेखील सजीवांचे रक्षण होतेच. पण मानवजात सुरक्षित राहील अशी भ्रामक कल्पना होती. पण आता सध्याप्रमाणे मानवी पृत्रिम व्यवस्था चालू राहिली तर मानवजातीचा फक्त तीन-चार दशकांत अंत होईल हे नक्की झाले आहे. तरी त्याबद्दल जाणीव होऊ दिली जात नाही. म्हणून उत्सर्जन तत्काळ शून्य होण्याची गरज असताना रोज पृथ्वीच्या पोटातून आठ ते नऊ कोटी बॅरल तेल उत्खनन चालू आहे. तेदेखील ज्ञानाचे व माहितीचे युग म्हटले जाते अशा काळात.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी पुढाकार घेऊन पॅरिस कराराला आकार दिला. करार सुचवत होता ती, कार्बन उत्सर्जन कमी करण्याची उपाययोजना आधीच अपुरी होती. आता तर मानवजात वाचविण्यासाठी हे उत्सर्जन रोखणे आवश्यक आहे असे हा करार सांगत होता. ती 2 अंश सेल्सिअसची सरासरी तापमानातील वाढ या ऑगस्ट महिन्यात प्रत्यक्ष झाली आहे.
ट्रम्पचे सोडा, कारण तो माणूस व जगातील बहुतांश राजकारणी सत्तेच्या कैफात आहेत, परंतु सर्वसाधारण मानवी जग, आपण स्वतः याचा उपाय करू शकतो आणि तो तसाच होऊ शकतो हेच समजून घेत नाही.
नवी पिढी ही मानवाची शेवटची पिढी ठरणार आहे. परंतु शाळा, महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात याचा ताजा संदर्भ बिलपूल नाही. याची कारणे व खऱया उपायांबाबत सरकारांना अज्ञान आहे व अर्थव्यवस्थेच्या प्रभावामुळे खरा उपाय सांगितला जात नाही. दहा हजार वर्षे ऊर्जाविरहित पृषियुग राबविणारा, शंभर वर्षांपूर्वी मँचेस्टरच्या स्वयंचलित यंत्रांना तोंड देण्यासाठी चरखा चालवणारा व माती कुडाच्या घरात स्वेच्छेने राहणारा हिंदुस्थान हा या समस्येचे उत्तर आहे. तो जगाला मार्गदर्शन करू शकतो, पण येथे राजकारणी व जनतादेखील गेल्या साठ वर्षांत औद्योगिकीकरण व जीडीपीच्या वाढीवर आधारित अर्थव्यवस्था स्वीकारल्यापासून सत्व, स्वत्व व शहाणपण गमावून बसली आहे.
यंत्र व उपभोगवादावर आधारित पाश्चात्य संस्कृतीची लाट परतविण्यासाठी गांधी व विवेकानंदांनी अविश्रांत मेहनत घेतली. महात्मा फुलेंनीदेखील शहरीकरणासाठी ब्रिटिशांकडून होणारे शेतीच्या शोषणावर आसुड ओढला.
मानवजातीचा अंत होत असताना तिला वाचविण्याऐवजी जगातील प्रतिस्पर्धी देशांना एकमेकांपेक्षा अधिक शक्तिमान व्हायचे आहे. ही कडेलोट करून घेणाऱयांतील स्पर्धा आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भेद ओळखला पाहिजे. विज्ञान आणि अध्यात्म एक होऊन हिंदुस्थानी पृषियुगातील वा जंगलाबरोबर जगण्याची ऊर्जाविरहित पद्धत ताबडतोब स्वीकारली तरच मानवजात व जीवसृष्टीचे रक्षण होऊ शकते. अर्थात औद्योगीकरण, शहरीकरण व अर्थव्यवस्था यांना स्थान नसावे. तंत्रज्ञान व पैसा हा प्रश्न सोडवू शकणार नाही. सध्याची प्रभावशाली माणसे एका भ्रमात असल्याने या दिशेने प्रयत्न करतील अशी शक्यता कमी आहे.
मानवजातीने अजून दुर्घटनांचा अनुभव येऊदे, मग विचार करू असे म्हणू नये. कारण त्या स्थितीत उपाय करण्याची संधी गेलेली असेल. नव्हे, चालढकल करून औद्योगीकरण चालू ठेवले तर सरासरी तापमानात आताच वाढ झाली आहे. पुढे ती आणखी होत राहील. त्यामुळे पुढील फक्त दोन-तीन वर्षांनी प्रयत्न करूनही काही उपयोग नाही, कारण मग पृथ्वी अशा अत्यवस्थ अवस्थेत जाईल की प्रकृती सुधारण्याच्या प्रयत्नांस ती साथ देऊ शकणार नाही.
(लेखक भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळीचे निमंत्रक आहेत.)




























































