साय-फाय – चंद्र आणि पृथ्वीची टक्कर होऊ शकेल का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

आजकाल बऱयाचदा एखादी उल्का पृथ्वीच्या जवळून जाणार असल्याच्या बातम्या आपण वाचत असतो. एकदा का शास्त्र्ाज्ञांनी ही माहिती दिली की, वेगवेगळ्या चर्चांना उधाण यायला सुरुवात होते. उल्केच्या टकरीमुळे पृथ्वीचा विनाश होणार का, मानवजात नष्ट होणार का, इथपासून ते उल्केच्या टकरीमुळे पृथ्वीच्या विशिष्ट भागात हिऱयांचा पाऊस पडणार इथपर्यंत विविध चर्चा झडायला लागतात. सध्या ‘पृथ्वी आणि चंद्राची टक्कर होऊ शकते का?’ हा विषय मोठय़ा प्रमाणात चर्चेला आला आहे, मात्र लोकांची ही भीती अनाठायी असल्याचे मत जगभरातील अवकाशतज्ञ सांगत आहेत.

कॅलिफोर्नियामध्ये असलेल्या नासाच्या ‘जेट प्रॉपल्शन लॅब’मध्ये ‘नियर अर्थ ऑबजेक्ट्स’ अर्थात पृथ्वीच्या जवळपास हिंडणाऱया अथवा पृथ्वीच्या जवळून जाण्याची शक्यता असणाऱया उल्का आणि धूमकेतूंचा अभ्यास केला जातो, त्यांच्यावर लक्ष ठेवले जाते. कोणता धूमकेतू अथवा उल्का ही पृथ्वीसाठी धोकादायक ठरू शकेल, हे या संस्थेतर्फे ठरवण्यात येते. आजपर्यंत या संस्थेतर्फे पृथ्वीच्या 19.45 करोड इतक्या परिक्षेत्रातील 28 हजार ‘नियर अर्थ ऑबजेक्ट्स’चा शोध लावण्यात आला आहे. या लॅबमधील शास्त्र्ाज्ञांच्या मते पृथ्वी आणि चंद्राची टक्कर होणे ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे.

ही टक्कर होणे अशक्य का आहे याबद्दलदेखील त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या सांगण्यानुसार पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती ही प्रचंड जास्ती आहे. गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीत फक्त ओढ नसते तर बऱयाचदा ही शक्ती धक्कादेखील देते. या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीत फक्त ओढच असती तर चंद्र आणि पृथ्वी यांची यापूर्वीच टक्कर झाली असती. चंद्राच्या आकाराचाच एखादा उल्कापिंड जर चंद्राला धडकला तरच चंद्र आपल्या स्थानावरून हलण्याची शक्यता आहे, मात्र येवढा मोठा आणि वेगवान उल्कापिंड जर चंद्रावर आदळला तर चंद्राचे अनेक तुकडे होतील. त्यानंतरदेखील या तुकडय़ांची पृथ्वीशी धडक होण्याची शक्यता अजिबात नाही. त्याचा काही भाग कदाचित पृथ्वीच्या दिशेने येऊ शकेल, मात्र त्यालाही हजारो वर्षांचा कालावधी लागेल. चंद्राला त्याच्या स्थानावरून हटवणे आणि पृथ्वीच्या दिशेने आणणे हे यामुळेच अशक्य असे काम आहे.

चंद्राची उत्पत्ती ही पृथ्वीच्या जोडीनेच झाली असे मानले जाते. नासाच्या माहितीनुसार जेव्हा पृथ्वी तयार होत होती त्या वेळेला तिच्याबरोबर ‘थिया’ नावाच्या एका प्रोटोप्लॅनेटची टक्कर झाली आणि चंद्र पृथ्वीपासून वेगळा झाला आणि पृथ्वीच्या जवळच त्याने आपले घर केले. दुसऱया एका थेअरीनुसार दोन अज्ञात अंतराळ वस्तूंची एकमेकांशी जोरदार टक्कर झाली आणि त्यातून चंद्र आणि पृथ्वीचे निर्माण झाले. या दोन्ही अज्ञात वस्तू मंगळ ग्रहापेक्षा पाच पट जास्ती मोठय़ा होत्या. पृथ्वीपासून साधारण 3.85 लाख किलोमीटरवर चंद्र आहे. पृथ्वीच्या साधारण एक चतुर्थांश आकार असलेल्या चंद्राच्या पृष्ठभागावर सर्वत्र खड्डेच खड्डे आढळून येतात. चंद्रावर या खड्डय़ांचे निर्माण करोडो वर्षांपूर्वी झाल्याचे मानले जाते. उल्का आणि इतर लघुग्रहांच्या टकरीमुळे हे खड्डे निर्माण झाले आहेत. खडकाळ अशा या चंद्राभोवती खूप तरल अशा गॅसची आवरणे (एक्सोस्फेयर) आहेत.

तर अशा या चंद्राचा पृथ्वीला काही धोका नाही हे आता शास्त्र्ाज्ञांनी सप्रमाण सिद्ध केल्याने चंद्राची चर्चा इथेच थांबवलेली बरी.

– [email protected]