>> शुभांगी बागडे
मातृभाषेविषयी प्रचंड प्रेम आणि अभिमान बाळगणाऱया डॉ. राजू रामेकर यांच्या प्रयत्नांमुळे आता मराठीतील ‘ळ’ हे अक्षर इंग्रजीत त्याच अचूक उच्चारांसह बोलले जाईल आणि विशिष्ट स्वरूपात लिहिले जाईल. याबद्दलचा कॉपीराईट नुकताच हिंदुस्थान सरकारकडून डॉ. रामेकर यांना देण्यात आला.
आपल्या मायबोलीबद्दल, आपल्या मराठी भाषेबद्दल आपल्याला अतीव अभिमान असतो, आपुलकी असते. त्यामुळेच कोणी चुकीचा उच्चार केला तरी आपण दुखावतो. मात्र हा अभिमान केवळ उच्चारांपुरताच का असावा? लिहिण्याबोलण्यातून भाषेचे मापदंड, तिची शुद्धता राखली गेली पाहिजे, असा आग्रह जेव्हा आपण धरू तेव्हाच भाषा टिकण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न होत आहेत असे म्हटले पाहिजे. भाषेबद्दलचा हा आग्रह धरणारे आणि त्यानुसार प्रयत्न करणाऱया अनेक व्यक्ती आणि संस्था यांचं कार्य आपण पाहतो. मराठी भाषा टिपून राहावी, त्यातील भाषाशास्त्र्ा अधिकाधिक लोकांना अवगत व्हावं यासाठीही प्रयत्न केले जातात. याबरोबरच इतर भाषेमध्ये विशिष्ट मराठी शब्द कसे लिहिले जावेत यासाठीही प्रयत्न होताना दिसतात. असाच प्रयत्न करणारे आणि त्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप देणाऱयांपैकी एक आहेत डॉ. राजू रामेकर. मातृभाषेविषयी प्रचंड प्रेम आणि अभिमान बाळगणाऱया डॉ. रामेकर यांच्या प्रयत्नांमुळे आता मराठीतील ‘ळ’ हे अक्षर इंग्रजीत त्याच अचूक उच्चारांसह बोलले जाईल आणि विशिष्ट स्वरूपात लिहिले जाईल. याबद्दलचा का@पीराईट नुकताच हिंदुस्थान सरकारकडून डॉ. रामेकर यांना देण्यात आला.
मराठी भाषेतील अनेक शब्द इंग्रजीत लिहिले जाताना त्यात बदल होतात. यात इंग्रजीचे काही स्वतंत्र नियमही आहेतच. त्यामुळेच ‘फ’ या उच्चारासाठी ‘एफ’ हे इंग्रजी मूळाक्षर उपलब्ध असूनही अनेकदा यासाठी ‘पीएच’ ही मूळाक्षरे लिहिली जातात. हा साधारण बदल असला तरी यात उच्चारात कोणताच बदल होत नाही, परंतु ‘ळ’च्या बाबतीत मात्र उच्चारही बदलला जातो. मराठी भाषेतील ‘ळ’ हे व्यंजन इंग्रजीत ‘एल’ असेच लिहिले जाते आणि तसेच उच्चारले जाते. इंग्रजी भाषेत ‘ळ’साठी कोणताच पर्याय उपलब्ध नाही, परंतु यामुळे मराठी शब्दांची, नावांची अक्षरशŠ मोडतोड होते. अशा इंग्रजी उच्चारांसकटच ही नावे रूढ झालेली अनेक उदाहरणे आहेत. केवळ पर्याय नाही म्हणून मराठीचे भाषासौंदर्य बिघडू द्यायचे हे डॉ. रामेकर यांना मान्य झाले नाही आणि त्यातून ‘ळ’ व्यंजनासाठी इंग्रजीत पर्याय तयार करण्याचा त्यांनी चंग बांधला. यासाठी त्यांनी सखोल संशोधन केले.
व्यवसायाने रेडिओलॉजिस्ट असलेले डॉ. राजू रामेकर हे मूळचे यवतमाळचे. सध्या ते तेलंगणातील आदिलाबाद येथे स्थायिक झाले आहेत. आपले अनेक व्यवहार इंग्रजीत होत असतात. या व्यवहारात ‘ळ’चा उच्चार पिंवा लेखन चुकीचा होत असल्याचं आपल्या लक्षात येतं. ज्यांच्या नावात, ठिकाणात ‘ळ’ अक्षर येतं त्यांच्या कागदपत्रांवर इंग्रजी भाषेत हमखास बदल झालेला आढळतो. अनेकदा नावात झालेला बदल मनस्ताप देणारा आणि नुकसानकारकही ठरतो. कधी दाखल्यावरील चुकीच्या नावामुळे शैक्षणिक सवलती नाकारल्या गेल्या आहेत, तर कधी ऐन वेळी रेल्वेचे आरक्षणही नाकारल्याच्या घटना आहेत. विशेषतŠ शेक्षणिक कागदपत्रांवर झालेले बदल पुढे तसेच ठेवावे लागतात. जातीचा दाखला, टीसी सर्टिफिकेट अशा अनेक कागदपत्रांमध्ये घोळ होतो. त्यामुळे नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागते ते वेगळेच.
डॉ. रामेकर यांच्याही हे लक्षात आलं. ‘यवतमाळ’, ‘महाबळेश्वर’ अशा शब्दांचे ‘यवतमाल’, ‘यवतमेल’, ‘महाबलश्वर’ हे उच्चार त्यांना खटकत होते. भाषेतील बदलामुळे मतभेद होत असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. हे पुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. मराठी भाषेची मोडतोड थांबविण्यासाठी इतर भाषांमध्ये नेमपं काय होत आहे, तिथेही असे शब्द इंग्रजीत जाताना त्यात बदल होतात का याचा त्यांनी अभ्यास केला. मराठीसोबत तेलुगू, कन्नड, तामीळ आणि मल्याळम या भाषेतही ‘ळ’ हे व्यंजन महत्त्वपूर्ण असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
मराठी भाषेतील ‘ळ’ इंग्रजीत कसा बदलला जातो आणि याचे भाषेवर काय परिणाम होतात याबद्दलचा संशोधन प्रकल्प त्यांनी शासनाकडे मांडला. इंटरनॅशनल अल्फाबेट ऑफ संस्पृत ट्रान्सलिटरेशनच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार इंग्रजी भाषेत ‘ळ’ कसा लिहावा यासाठीही त्यांनी संशोधन केलं. मराठीतील ‘ल’ इंग्रजीत लिहिताना ‘एल’ हे अक्षर वापरले जाते. ‘ळ’चा उच्चार ‘ळ’च राहावा व तो इंग्रजीत ‘ळ’ म्हणूनच ओळखला जावा यासाठी इंग्रजीत ‘ळ’ लिहिताना इंग्रजी ‘एल’ लिहून त्याच्याखाली आडवी रेषा काढावी लागेल असा बदल व याला आनुषंगिक संशोधन डॉ. राजू रामेकर यांनी शासनाकडे मांडले. इंग्रजी ‘ळ’ भाषेतील बदलासह त्याच्या का@पीराइटची आता डॉ. रामेकर यांच्या नावावर नोंद झाली आहे.
शासकीय पातळीवर हा बदल मान्य झाला आहेच. मात्र आता आव्हान आहे ते तांत्रिक पातळीवर हा बदल कार्यान्वित होण्यासाठी काय प्रयत्न केले जातात याचे. इंग्रजीत ‘ळ’ लिहिता येणारे कीबोर्ड, टाइपरायटर यात बदल केले पाहिजेत. याचबरोबरच यासाठी लिपी तयार केली गेली पाहिजे. तरच हा बदल कायमस्वरूपी राहील, असे डॉ. रामेकर यांचे मत आहे.
प्रत्येक मराठी शब्दाची, नावाची, गावाची वा वस्तूची मूळ ओळख तशीच राहावी या ध्यासाने डॉ. राजू रामेकर यांनी हे संशोधन केले आणि या संशोधनाचे का@पीराईटही केले. त्यांच्या या ध्यासामुळे मराठी भाषेची मोडतोड कायमची थांबेल हा विश्वास वाटतो.




























































