
>> शुभांगी बागडे
राज्य पातळीवर अनेकानेक योजना येत असल्या तरी कुपोषणाचा टक्का कमीअधिक फरकाने बदलायचे नाव घेत नाही ही वस्तुस्थिती आहे. नेमक्या अशाच वेळी ज्वारी, बाजरी, नागलीसारख्या उच्चतम पोषक मूल्यांच्या भरड धान्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. मात्र प्रथिने असलेल्या धान्यांच्या जाती आणि स्थानिक भरडधान्य यांचा पोषक तत्त्वांच्या दृष्टीने विचार करण्याची वेळ आता आली आहे.
राज्याच्या सर्वसामान्य पोषण कुपोषण परिस्थितीपेक्षा सुमारे 25 आदिवासी तालुक्यांमध्ये कुपोषणाची तीव्रता जास्त आहे याची वेगवेगळी आणि संमिश्र कारणे आहेत. स्थलांतर, लवकर मुले होणे, जास्त अपत्य संख्या, बाल संगोपनात निष्काळजीपणा, आरोग्य सेवांची कमतरता, त्या त्या जमातीच्या प्रथा-कुप्रथा, दारू व्यसनाचा अतिरेक, दुर्गमता वगैरे अनेक कारणे आहेत. त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे बदललेली आहारशैली. ही व्यवस्था उत्पादन आणि जीवनशैली याबाबतही महत्त्वाची ठरते. आपल्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो चांगला आहार. आपण जसे खातो तसे घडतो. आपल्या आहारात पोषणमूल्यांचा योग्य समतोल असेल तर आपल्याला शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राखता येते आणि आजारांना दूर ठेवता येते तसेच बरे करता येते. आदिवासी भागात विशेषकरून याबाबत अभाव आढळतो.
महाराष्ट्रातील सर्वसामान्य पोषणाचा स्तर हा मध्यम पातळीवरच आहे. कारण महाराष्ट्रातील आहार व राहणीमानाचा दर्जा फारसा समाधानकारक नाही. महाराष्ट्रात सुमारे 30 टक्के बाळांचे जन्मत: वजन अडीच किलोंपेक्षा कमी असते. स्त्रियांचे कमी वयात लग्न व बाळंतपण आणि शरीराचे वजन कमी हे मूल कुपोषित असण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. हे कारण पिढीजात तर आहेच, पण गेल्या काही वर्षांत बददलेली आहारव्यवस्थाही त्याला कारणीभूत आहे. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रीयन जेवणात धान्य उष्मांकांचे प्रमाण बरे असले तरी प्रथिनांचे प्रमाण कमी पडते. यातच आपली बदललेली जीवनशैलीही कारणीभूत ठरत आहे.
एखाद्या गरीब कुटुंबाची आर्थिक प्रगती होऊ लागली की आहारातील नाचणी, ज्वारी, बाजरीची भाकरी गायब होते. विशेषत: गहू आणि पांढरा भात याला प्राधान्य दिले जाते. भातउत्पादक प्रदेश सोडले तर पांढऱ्या लांबसडक तांदळालाच प्राधान्य दिले जाते. मात्र भात आणि गव्हाच्या तुलनेत नाचणी, ज्वारी, बाजरी ही तृणधन्यं अधिक पौष्टिक आहेत, हे ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूट्रिशन’च्या अहवालात नमूद आहे.
पूरक आहाराच्या जाणिनेतून शहरातील मध्यमवर्गातूनही भरडधान्यांची मागणी काढत आहे. आदिवासी भागातील मुलांचे कुपोषण, महिलांमधील अनिमिया यासाठी नागली बहुगुणी आहे. काळभात, जिरकेल, लालभात ही काही पारंपरिक वैशिष्टय़पूर्ण तांदूळपिके तर नाचणी, वरई, साका, राळा, भादली ही डोंगरउतारावर येणारी पिकं म्हणजेच मिलेट अर्थात भरडधान्य निरोगी पोषकशैलीसाठी उपयुक्त ठरत आहेत. या सर्व धान्यांचे महत्त्व एकंदरच मानव जातीसाठी खूप मोठे आहे. ज्वारी, बाजरी, नागली या भरड धान्यांमध्ये गहू आणि तांदूळ यापेक्षा कित्येक पटीने अधिक खनिज, कॅल्शियम, प्रथिने असल्याचे राष्ट्रीय पोषण संस्थेच्या आतापर्यंतच्या अनेक अभ्यासांमधून सिद्ध झाले आहे.
आपल्याकडे ज्या लोकांकडे अन्नधान्य खरेदी करायची कुकत नाही, त्यांना स्कस्तात, नियंत्रित दरात अन्नधान्य पुरकणं या हेतूने रेशनिंगची यंत्रणा उभी केली गेली. अन्नसुरक्षा कायद्यामुळे दुर्गम भागातही रेशनकर खात्रीने गहू आणि तांदूळ मिळतोच. पण कुपोषणाच्या दृष्टीने या यंत्रणेकडे पाहताना महत्त्वाची त्रुटी आढळते ती म्हणजे रेशनकर फक्त तांदूळ आणि गहू मिळतात. त्यात डाळी मिळत नाहीत. स्थानिक लोक खातात ते ज्कारी, नाचणीसारखं भरड धान्य रेशनकर मिळत नाही. मग केवळ तांदळाने सकस पोषण कसे साध्य होणार.
यंदाही आदिकासी बालकांच्या कुपोषणाच्या प्रश्नाने पुन्हा डोके कर काढले आहे. राज्यपातळीवर अनेकानेक योजना येत असल्या तरी कुपोषणाचा टक्का कमीअधिक फरकाने बदलायचे नाव घेत नाही ही वस्तुस्थिती आहे. कुपोषित बालकांसाठी कोटय़कधी रुपयांची आहार पाकिटं, आरटीयूफसारख्या नवनव्या पद्धती उपयोगात आणल्या खऱया; पण त्यातील त्रुटींमुळे अजूनही हवा तो परिणाम साध्य झालेला दिसत नाही. मुळात बालकांच्या कुपोषणाचे मूळ मातांच्या कुपोषणात असल्याचे कैद्यकीय संशोधनांनी सिद्ध केले आहे. आजही हिंदुस्थानातील महिला ऑनिमिक अर्थात रक्तात लालपेशींचं पुरेसं प्रमाण नसल्याने अशक्त असल्याचा टक्का आहेच. नवमाता या शारीरिकदृष्टय़ा अशक्त असण्याचं प्रमाण आपल्याकडे जास्त आहे. मात्र तरीही योग्य पोषण पद्धती विकसित करण्यात आपण कमी पडत आहोत. नेमक्या अशाच वेळी ज्कारी, बाजरी, नागलीसारख्या उच्चतम पोषक मूल्यांच्या भरड धान्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. सध्या भरड धान्यांच्या उत्पादनात देशाचा आलेख कमालीचा खाली घसरला आहे.
याबाबत महाराष्ट्राने आंध्र प्रदेश, तेलंगणा क ओडिशा या राज्यांनी राबवलेल्या ‘मिलेट मिशन’ यासारख्या उपक्रमाचा आदर्श घेण्यासारखा आहे. या राज्यांतून महाराष्ट्रापेक्षा नागलीचे उत्पादन कमी असूनही ते हिरीरीने हा उपक्रम राबकीत आहेत. शेतकरी आदिकासी कुटुंबांचा त्याला खूपच चांगला प्रतिसाद आहे. अनेक स्कयंसेकी संस्थांच्या मदतीतून हा अनेखा कार्यक्रम तयार केला क राबकिला जात आहे. यात रिक्हायटलायझिंग रेनफेड ऑग्रिकल्चर नेटकर्कचा मोलाचा काटा आहे.
लहान मुलांचे पहिल्या दोन कर्षांत जर कुपोषण झाले तर त्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास खुंटतो, हे संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे. हे सत्य स्वीकारून नाचणी, बाजरीसारख्या भरड धान्यांची उत्पादकता काढकणे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. ओडिशा सरकारने याबात पाऊल उचलले आहे. या राज्यात शेतकऱयांना या पिकांबाबत प्रोत्साहन देतानाच वाढलेल्या उत्पादकतेला वाव देणारे अनेक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. यात नाचणीपासून तयार होऊ शकणाऱया अनेक पदार्थांची राज्यात मोठय़ा प्रमाणाकर जाहिरात करण्यात आली आहे. नागलीकर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यात आले आहे. सर्कात महत्त्काचे म्हणजे मुलांच्या माध्यान्ह भोजन योजनेत आणि अंगणकाडीच्या आहारात नागलीच्या पदार्थाचा समाकेश करण्यात आला. या सगळ्याचे उत्साहकर्धक परिणाम दिसायला सुरुकात झाली आहे. कुपोषणाची महत्त्वाची पायरी असते ती प्रथिनांची कमतरता. या पार्श्वभूमीकर उपायांचा किचार करता जीकनसत्त्के, पोषक पदार्थ, प्रथिने असलेल्या धान्यांच्या जाती आणि स्थानिक भरडधान्य यांचा पोषक तत्त्कांच्या दृष्टीने किचार करायला पाहिजे.





























































