
>> शमिका कुलकर्णी (आहारतज्ञ)
आयुर्वेदात च्यवनप्राशचे अनेक फायदे सांगितले आहेत. च्यवनप्राशमध्ये मुख्य घटक म्हणजे आवळा. त्यात मुख्यतः आवळ्यासोबत पिपली, अश्वगंधा, तुळस, वेलची, ब्राम्ही, केशर, घृत , मध, तूप, साखर घटक असतात. आता साधारतः च्यवनप्राशचे सेवन सर्वांसाठीच योग्य असले तरी दीर्घ काळ घेत असल्यास वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावे. च्यवनप्राश आपण सकाळी रिकाम्यापोटी किंवा जेवणाआधी घेऊ शकतो. बरेच जण गाईच्या दुधात घालून पितात. या आरोग्यदायी च्यवनप्राशचे अनेक फायदे कोणते आहेत?
- च्यवनप्राशमध्ये ऑण्टिव्हायरल, ऑण्टिफंगल गुण असल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि शरीराला सांसर्गिक रोगांपासून संरक्षण मिळते.
- आवळ्याचा समावेश असल्याने मुबलक प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व शरीराला मिळण्यास मदत होते. ‘क’ जीवनसत्त्वाच्या ऑण्टिऑक्सिडंट गुणांमुळे त्याचाही उपयोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यास होतो.
- श्वसनक्रियेच्या तक्रारींसाठी च्यवनप्राश अतिशय उपयुक्त असल्याने सध्याच्या काळात याचा समावेश नियमित केल्याने आरोग्याला नक्कीच फायदा होईल.
- च्यवनप्राश आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पित्ताचा त्रास कमी होतो आणि त्यातील आयुर्वेदिक घटकांमुळे ऑसिडिटी, जळजळ होत नाही.
- च्यवनप्राशमधील अनेक नैसर्गिक घटकांमुळे आपल्या शरीरातील आम्लपदार्थ आणि विषद्रव्य बाहेर टाकली जातात आणि शरीराला डिटॉक्स करण्यास मदत होते.



























































