नेत्रहीनांचे डोळस जग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> कावेरी सावंत

कॅलेंडर्स आपण नेहमी पाहत असतो. अगदी अंधांसाठी ब्रेल लिपीतील क@लेंडरही तयार केले जात होते, परंतु त्यांचा वापर फक्त अंध बांधवच करू शकत होते. अंधांना आणि डोळस व्यक्तींनाही एकच कॅलेंडर वापरता येईल असे कॅलेंडर मात्र पुठेही उपलब्ध नव्हते. असे कॅलेंडर करण्याची कल्पना ‘ब्रेल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे स्वागत थोरात यांना सहा वर्षांपूर्वी सुचली आणि अंध आणि डोळस व्यक्तींनाही वापरता येईल असे एकच कॅलेंडर आकारास आले.

जगभरातील अंधांच्या जीवनात शिक्षणाचे, ज्ञान, माहिती, मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरलेल्या ब्रेल लिपीचा शोध लावणाऱया लुई ब्रेल यांची जयंती दरवर्षी 4 जानेवारी रोजी साजरी केली जाते. या वर्षी लुई ब्रेल यांची ही 210 वी जयंती विशेष ठरली आहे. कारण संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासभेने 17 डिसेंबर 2018 रोजी ठराव संमत करून 4 जानेवारी या लुई ब्रेल यांच्या जयंतीस जागतिक ब्रेल दिन घोषित केले. अंधांच्या आयुष्यातील ब्रेलच्या उपयुक्ततेविषयी जागरूकता वाढविणे आणि जगभरातील अंधांच्या कल्याणासाठी ब्रेलच्या अधिकाधिक वापरास उत्तेजन देणे हा या ठरावाचा मुख्य उद्देश आहे.

आपल्या समाजात एकूणच विकलांगांबद्दल अनेक गैरसमज आहेत. दृष्टिहीनांच्या बाबतीत असणारा फुकाचा कळवळा त्यांच्या विश्वाबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवण्यास जास्त कारणीभूत ठरतो. यात अंधांसाठी भरीव सोयीसुविधा देण्याबाबतची शासनाची अनास्था अधिक भर घालते. मात्र नेत्रहीनांसाठी काम करणाऱया अनेक व्यक्ती आणि संस्था वेगवेगळय़ा माध्यमातून नेत्रहिनांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. नेत्रहीनांना सक्षम बनवण्यासाठीचा प्राथमिक उपाय म्हणजे त्यांना ब्रेल भाषा शिकवणं आणि याच भाषेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत सोयीसुविधा, शिक्षण, तंत्रज्ञान देणं. स्वागत थोरात ब्रेल लिपीद्वारे वेगवेगळय़ा माध्यमातून नेत्रहीनांसाठी काम करतात. ‘ब्रेल मॅन ऑफ इंडिया’ हीच त्यांची ओळख बनली आहे इतपं काम त्यांनी नेत्रहीनांसाठी केलं आहे.

अंधांसाठी नाटक बसवणं व इतर वेगवेगळय़ा उपक्रमांमधून स्वागत थोरात नेत्रहीन माणसांच्या संपका&त येत राहिले आणि त्यांना यांच्या खऱया समस्यांची जाणीव होऊ लागली. हिंदुस्थान साहित्य क्षेत्रात इतका सुसंस्पृत असताना अंध व्यक्ती मात्र या साहित्यापासून वंचित होत्या. कारण ब्रेल लिपीतील नियमितपणे प्रकाशित होणारं एकही नियतकालिक नव्हतं. म्हणूनच त्यांनी ‘स्पर्शज्ञान’ हे हिंदुस्थानातील पहिलं ब्रेल पाक्षिक सुरू केलं. 2008 साली सुरू झालेल्या ‘स्पर्शज्ञान’चं सध्याचं 11 वं वर्ष. महाराष्ट्र, संपूर्ण हिंदुस्थान आणि जगभरात नियमितपणे हे पाक्षिक वाचलं जातं. नेत्रहीनांपर्यंत पोहोचतं. आज स्पर्शज्ञानचे असंख्य वाचक आहेत.

दृष्टिहीनांकडे पाहिलं की, एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे त्यांना दृष्टी नसली तरी त्यांची इतर ज्ञानेंद्रिये अधिक तीव्र असतात. त्यांची एकाग्रता कमालीची असते. वास व स्पर्श यांचे आकलन अधिक सूक्ष्म असतं. ब्रेल लिपी म्हणजे अंधांसाठी साक्षरतेचे माध्यम आहे. साक्षरता हा शिक्षणाचा मुळाधार आहे आणि अंधांना सक्षम करण्यात मुख्य आवश्यकता असलेल्या ज्ञानाकडे त्यांना घेऊन जाण्यात ब्रेलची भूमिका खूप महत्त्वाची आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ब्रेल लिपीचा वापर करणे सोपे झाले आहे. नव्या स्मार्ट जगातही ब्रेल लिपीने ‘ऑर्बीटरिडर’, ‘ब्रेलमी’ अशा अत्याधुनिक उपकरणांच्या माध्यमांतून अंधांच्या जीवनात नवे स्थान निर्माण केले आहे. ब्रेल लिपीच्या वापरामुळे अंधांचे जीवन सुकर होण्यासही सुरुवात झाली आहे. नवीन वर्ष सुरू झाले की घरात, कार्यालयांत आणि बाजारातही वेगवेगळय़ा प्रकारच्या दिनदर्शिकांचे आगमन सुरू होते. प्रत्येकाच्या आवडीनुसार, गरजेनुसार या दिनदर्शिकांची निर्मिती केली जाते. भिंतीवर लावण्याचे आणि टेबलावर ठेवण्याचे कॅलेंडर्स आपण नेहमी पाहत असतो. अगदी अंधांसाठी ब्रेल लिपीतील कॅलेंडरही तयार केले जात होते, परंतु त्यांचा वापर फक्त अंध बांधवच करू शकत होते. अंधांना आणि डोळस व्यक्तींनाही एकच कॅलेंडर वापरता येईल असे कॅलेंडर मात्र पुठेही उपलब्ध नव्हते. असे कॅलेंडर करण्याची कल्पना ‘ब्रेल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे स्वागत थोरात यांना सहा वर्षांपूर्वी सुचली, परंतु अंध आणि डोळस व्यक्तींनाही वापरता येईल असे एकच कॅलेंडर प्रत्यक्षात आणणे हे कठीण काम होते. प्रचलित ब्रेल छपाई पद्धतीने ते शक्य नव्हते. गेलॉर्ड आर्टचे अरविंद पुरंदरे यांच्या सहकार्याशिवाय असे ब्रेल टेबल कॅलेंडर तयार करणे शक्य झाले नसते. अरविंद पुरंदरे यांनी ब्रेल लिपीतील स्टिकरच्या छपाईबाबत स्वागत यांच्याशी संपर्प साधला. त्यांना एका ठरावीक औषध कंपनीसाठी ब्रेल लिपीतील छपाई केलेली लेबल्स तयार करायची होती. हवी होती. ही औषधे कंपनीकडून युरोपीय देशात पाठवली जाणार होती. युरोपीय देशांमध्ये कायद्यानुसार संबंधित औषधांची नावं लेबलवर ब्रेल लिपीतही असणं बंधनकारक आहे. आपल्याकडे मात्र याबाबत कोणताच कायदा नाही. अरविंद पुरंदरेंचा हा प्रश्न सुटला, मात्र यापुढे नेत्रहीनांसाठी याबाबत काय करता येईल याबाबत दोघांनीही प्रयत्न सुरू ठेवलं आणि यातूनच ब्रेल लिपीतील टेबल कॅलेंडर आकारास आले. अरविंद पुरंदरे यांच्या सहकार्याने ब्रेल छपाईचे नवीन तंत्र विकसित केले गेले आणि इ.स. 2013 साली हिंदुस्थानात प्रथमच अंधांसाठी ब्रेल टेबल कॅलेंडर तयार झाले. ब्रेल कॅलेंडरबरोबरच अंधांसाठी व्हिजीटिंग कार्ड, वेगवेगळे लेबल्स, स्टिकर्स, अंधांसाठी सूचना असलेल्या पाटय़ा अशा वेगवेगळय़ा माध्यमातूनही नेत्रहीनांना आधारभूत सोयी उपलब्ध करून दिल्या जातात.

हे कॅलेंडर सर्व अंध बांधवांपर्यंत कसे पोहोचवायचे असा प्रश्न होता. ही कल्पना स्वागत थोरातांनी रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांच्यापुढे मांडली. ती त्यांना आवडली आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून 2013 पासून दरवर्षी संपूर्ण हिंदुस्थानभर हे ब्रेल टेबल कॅलेंडर अंध व्यक्ती, अंधांसाठी काम करणाऱया संस्था आणि व्यक्तींना भेट म्हणून पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. या ब्रेल टेबल क@लेंडरचे हे सहावे वर्ष आहे. हे कॅलेंडर व या कॅलेंडरचे वैशिष्टय़ म्हणजे हे अंध आणि डोळस दोघेही वापरू शकतात.