
>> डॉ. नीता ताटके (मलखांब प्रशिक्षक)
या कोरोना काळात मुलांवर खूपच मर्यादा होत्या, अजूनही आहेत. त्यांचे मानसिक आरोग्य राखण्यासाठी प्रयत्न करणे खूप गरजेचे होते.
लॉकडाऊनमध्ये कोणालाच घराबाहेर पडता येत नव्हतं. महाविद्यालयीन वयोगटातील मुलं घरातल्यांपेक्षा मित्रमैत्रिणींसोबत जास्त वेळ असतात. आता आपल्याला सतत पालकांच्या समोर राहायला लागतंय हा एक मुलांच्या दृष्टीने आव्हानात्मक भाग असतो. दुसरी गोष्ट म्हणजे घरातील कामाची सवय नसते. त्यामुळे आता घरातली कामे करावी लागत आहेत, मोठी माणसं सतत तुमच्या आसपास असतात. ही दोन आव्हानं मुलांशी बोलताना माझ्या लक्षात आली आहेत. त्यांचं मानसिक आरोग्य किंवा भावनिक आरोग्य, प्रामुख्याने त्यासाठी आम्ही मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमात मुलं फार मोकळेपणाने त्यांच्या अडचणींविषयी बोलली. दुसरं माझ्या लक्षात आलं की, मुलंही त्यांच्यापरीने प्रयत्न करत आहेत. नंतर बऱयाच मुलांनी बोलावून त्यांच्या समस्या सांगितल्या. मला सगळं समजतंय, पण नेमपं काय करायचं कळत नाही. त्यामुळे सातत्याने वाद होतायत. या काळात भावनिक समस्या मुलांनी खूप सांगितल्या आणि भावनिक समस्यांवर मुलांशी जास्त संवाद साधला असं मला वाटतंय, पण कोरोनामुळे आरोग्याचे महत्त्व खूप मोठय़ा प्रमाणात लक्षात आले.
एक वेळेस आपल्याकडे सगळ्या गोष्टी असतील, पण आरोग्य नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. तसेच एक गोष्ट जाणवली की, मुलांना आई करत असलेल्या कामांची जाणीव झाली, घरामधल्या कामाचं महत्त्व कळलं. तिची कामं पाहून मुलांनी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला. हे कोरोनाने त्यांना शिकवले. हे मला खूप जणांकडून कळलं. मला फार आनंद झाला. तसेच केवळ महाविद्यालयीन विद्यार्थीच नव्हे तर मी व्यायामशाळेत शिकवत असल्यामुळे मला व्यायामशाळेतील लहान मुलं, सोसायटीतले लोक, मुलाचे सहकारी यांच्याशीही मी संवाद साधला. त्यावेळी जाणवलं की, घरातली कामं किती महत्त्वाची असतात याची त्यांना जाणीव झाली. मुलं घरातील काम करायला लागली. त्यांचे डोळे उघडले. ही कोरोनाने मोठय़ा प्रमाणात जाणीव लोकांना करून दिलेली आहे. त्यामुळे शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि कामांची जाणीव कोरोनाने दिलेला मोठा धडा आहे.
लॉकडाऊनमध्ये माझ्या मानसशास्त्र विभागातर्फे मुलांसाठी एक खास उपक्रम केला होता. लॉकडाऊनमध्ये घरात राहून मुलांचे मानसिक संतुलन बिघडत चालले होते. नेमपं काय करायचं त्यांना सुचत नव्हतं. विद्यार्थ्यांची ही समस्या लक्षात घेता मुलांनी स्वतःचं मानसिक संतुलन कसं राखलं पाहिजे या विषयावर आम्ही आमच्या विभागातर्फे -आम्ही मानसिक शास्त्र विभागाच्या तिघी शिक्षिका आहोत – लहानशी प्रश्नावली तयार करून मुलांपर्यंत पोहोचवली होती. याची उत्तरे द्या आणि तुमचा जर विशिष्ट स्कोअर आला असेल तर तुमचे मानसिक संतुलन चांगले आहे. ज्यांचा स्कोअर तसा आला नाही त्यांना मार्गदर्शन केले. हा उपक्रम आम्ही मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी करत होतो. त्यासाठी पुठल्याही प्रकारचे पैसे आकारत नव्हतो तसेच तो महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर आम्ही टाकला होता. उपक्रमाची सूचना सर्व मुलांना देत होतो. आमच्या दृष्टीने हे एक आम्ही चांगले काम करत होतो.


























































