
>> राहुल ग्रोव्हर
घरांच्या किमती साधारण दर आठवडय़ाला बदलत असतात आणि त्याचप्रमाणे लोकांचा त्याकडे पाहायचा दृष्टिकोनदेखील. घर-खरेदी आणि विक्री ही तशी वेळकाढू प्रक्रिया आहे. यासंबंधी कोणताही बदल झाल्यास तो त्वरित ब्रोकरने तुमच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. प्रामुख्याने घराची विक्री करताना जे तुम्हाला ऐकावेसे वाटेल, फक्त तेच सांगणाऱया ब्रोकरपासून सावध रहा. ब्रोकर म्हणजे एक असा प्रतिनिधी नेमा, जो सर्वाधिक किफायतशीर व्यवहाराकरिता मदत करेल. सुरुवातीपासून स्पष्ट आणि पारदर्शक संभाषण असल्यास अवास्तविक अपेक्षांना थारा उरत नाही.
घराची खरेदी करतेवेळी खरेदीदार एक सर्वात मोठी चूक करतात. रिअल इस्टेट ब्रोकरला आपल्या प्राधान्य सूचीत समाविष्ट न करण्याची चूक गृहखरेदीदार करतात. त्यामुळे अंतिम व्यवहार नक्की करताना सुमारे 30 टक्के अतिरिक्त खर्चाच्या कचाटय़ात खरेदीदार अडकतो. हेच खरेदीदार त्यांच्या घराशी संबंधित इतर निर्णय जसे की, मेकॅनिक, प्लम्बर आणि अगदी डॉक्टरांचा शोध घेताना मात्र सर्वोत्तम विश्वासार्हता तपासतात आणि शक्य तितके पर्याय बघतात, परंतु आपला ब्रोकर निवडताना तितकासा विचार होताना दिसत नाही.
एखादा ब्रोकर वर्षभरातून किमान डझनवार घरे विकतो. वास्तविक हा ब्रोकर अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत खरेदीदाराच्या सावलीप्रमाणे वावरत असतो. दर दिवशी याच विषयाशी त्यांचा संबंध येत असल्याने त्यांना क्षेत्राविषयी आपल्याहून अधिक माहिती असते. परिणामी या प्रवासात एखाद्या योग्य ब्रोकरचे मार्गदर्शन मिळणे कठीण असते.
एक योग्य ब्रोकर शोधण्याकरिता पुढील काही टिप्स : प्रामुख्याने घराची विक्री करताना जे तुम्हाला ऐकावेसे वाटेल, फक्त तेच सांगणाऱया ब्रोकरपासून सावध रहा. ब्रोकर म्हणजे एक असा प्रतिनिधी नेमणे, जो तुम्हाला सर्वाधिक किफायतशीर व्यवहाराकरिता मदत करेल. अशा स्थितीत सुरुवातीपासून स्पष्ट आणि पारदर्शक संभाषण असल्यास अवास्तविक अपेक्षांना थारा उरत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक असा रिअल इस्टेट ब्रोकर नेमा, जो तुमच्या गरजांना साह्य पुरवेल. उगाच
अवास्तव महागडे व्यवहार गळ्यात घालणाऱया ब्रोकरपासून दूरच रहा!
रिअल इस्टेट ब्रोकरची कौशल्ये जाणून घेण्यासाठी त्याची मुलाखत घ्या. त्याचे क्षेत्राविषयी असलेले ज्ञान आणि सध्याच्या खरेदी-विक्रीशी निगडित परिमाणांवर काम करण्याची क्षमता जाणून ब्रोकर निश्चित करा. परंपरागत चालत आलेली एजंटसोबतच्या व्यवहाराची जुनी पद्धत आता संपुष्टात आली आहे. एखाद्या चांगली माहिती असलेल्या दोन्ही पक्षांच्या हितासाठी काम करणाऱया ब्रोकरवर विश्वास ठेवून त्याच्याशी व्यवहार करणे हितावह ठरते.
कोणत्याही खरेदी-विक्री प्रक्रियेत जेव्हा तुम्ही काही देऊ करता, त्यावेळी तडजोडही महत्त्वपूर्ण ठरते. तुमच्या ब्रोकरकडे चांगले संभाषण कौशल्य असले पाहिजे. तुमच्या समोरचा पक्ष तुमच्या विरोधात जाईल अशी एखादी गोष्ट मांडत असल्यास ब्रोकरला अटकाव करता आला पाहिजे. ब्रोकरची निवड करताना त्याला तो व्यवहार बोलणीदरम्यान नियमित वापरत असलेल्या धोरणांविषयी विचारणा करा. जर त्याच्याकडे असे धोरण नसेल तर त्याची निवड तुमच्या फायद्याची ठरणार नाही.
दोन्ही बाजूची सुरक्षा महत्त्वाची ठरते. अटी आणि प्राधान्य काय राहील याविषयीचा एक करार करणे ही बुलेटप्रूफ पद्धत आहे. ब्रोकरचा ट्रक रेकॉर्ड चांगला असणे महत्त्वाचे आहे; तीन घटकांच्या आधारे तो तपासण्यात यावा – प्रमाणपत्रे, अनुभव आणि संपर्क/संदर्भ. हा तपास केल्याने तुम्हाला त्यांची पात्रता, कामगिरी, कामाचे तास आणि आधीच्या क्लायंट्सचे मत समजेल. यावरून ब्रोकर हा तुमच्या गरजांनुरूप आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी मदत होईल.
घरांच्या किमती साधारण दर आठवडय़ाला बदलत असतात आणि त्याचप्रमाणे लोकांचा त्याकडे पाहायचा दृष्टिकोनदेखील. घर-खरेदी आणि विक्री ही तशी वेळकाढू प्रक्रिया आहे. यासंबंधी कोणताही बदल झाल्यास तो त्वरित ब्रोकरने तुमच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे.
(लेखक एसईसीसीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)





























































