
>> ग्लेन कायसर
साऊंड डिझाइन आणि मिक्सिंगचा कल्पक वापर हा कन्टेन्ट निर्मितीला एकसंधता देणारा घटक आहे. फिल्मच्या कथाकथनाच्या क्षमतेमध्ये या गोष्टी भर टाकतात. साऊंड डिझाइन हा एक सर्जनशील आणि निर्मितीच्या सर्व बाजू व्यापणारा कला प्रकार आहे. स्वच्छ आणि अत्यंत समतोल अशा ध्वनीची निर्मिती करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा कौशल्य संच आणि ज्ञान यांची गरज असते. ध्वनिनिर्मिती आणि संयोजनाच्या कलेमध्ये रस असणाऱया आणि या विषयाशी संबंधित विविध तांत्रिक बाबी शिकून घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी साऊंड इंजिनीअरिंगचा कोर्स अत्यंत साजेसा आणि फायदेशीर ठरू शकतो.
ध्वनी, आवाज ही एक कला आहे आणि एक कसबही आहे. ते एक असे कलाकौशल्य आहे ज्याचा आनंद अनेकांना घेता येतो, पण त्याची माहिती मात्र फार थोडय़ांना असते. जॉर्ज ल्युकास यांचे एक वचन आहे, `Sound is half the experience’ आवाजातून एखाद्या गोष्टीचा जवळजवळ निम्मा अनुभव मिळतो. आवाजाच्या जबरदस्त परिणामामुळेच तर एखाद्या चित्रपटाचा अनुभव अधिकच उठावदार बनतो, त्यातील प्रसंगांना एक पोत मिळतो. त्यातील बारकावे ठळक होतात. प्रेक्षकांना अंतर्बाहय़ झपाटून टाकणाऱया प्रवासावर घेऊन जाण्याची ताकद ध्वनीमध्येच असते.
आज संगीताने आणि श्राव्य अनुभवांनी ग्राहकांच्या आयुष्यातील मोठी जागा व्यापली आहे. लोकांना संगीत आणि पॉडकास्टस् ऐकण्याची किंवा घरच्या घरी किंवा प्रवासातही टीव्ही आणि चित्रपट पाहण्याची सोय सहज उपलब्ध आहे. या सगळ्यामुळे आज ध्वनी तंत्रज्ञान हा आपला सर्वात जवळचा सोबती बनला आहे. या काळात ग्राहकांच्या वर्तणुकीतही बदल घडून येत आहेत. विविध माध्यमांतील दृकश्राव्य कार्यक्रम, अर्थात कन्टेन्ट प्रेक्षकांकडून स्वीकारले जाण्याच्या प्रमाणात कित्येक पटींनी वाढ झाली आहे आणि ग्राहकांच्या वर्तनात बदल घडून येत आहे. कन्टेन्ट पाहिला जाण्याच्या प्रमाणात कित्येक पटींनी वाढ झाली आहे आणि ब्रॅण्डस्ना सुधारित ध्वनी तंत्रज्ञानांच्या साथीने आपला कन्टेन्ट विकसित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे. वेगवेगळे आवाज एखाद्या दृश्य अनुभवाला अधिक अर्थपूर्ण बनवतात, त्याला भावभावनांची जोड देतात, त्यामुळे आज ग्राहक आवाजाकडे अधिक बारकाईने लक्ष देत आहेत.
एका अर्थाने साऊंड डिझाइन म्हणजे चित्रपटातील अदृश्य नायक असे म्हणता येईल. साऊंड डिझाइनचा योग्य वापर केला गेला तर प्रेक्षकांना आपण कथेतील पात्राच्या जागी असल्याचा अनुभव मिळतो. त्यांना पात्रांच्या नजरेतून जग अनुभवता येते. म्हणूनच ध्वनी तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर कसा करता येईल याची माहिती असणे आजच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. तेव्हा उच्च दर्जाचा दृकश्राव्य आनंद देणाऱया गोष्टी सांगायची आवड असेल तर तुम्ही साऊंड डिझाइन आणि इंजिनीअरिंगच्या अभ्यासाकडे निश्चित ओढले जाल!
साऊंड डिझाइन आणि मिक्सिंगचा कल्पक वापर हा कन्टेन्ट निर्मितीला एकसंधता देणारा घटक आहे. फिल्मच्या कथाकथनाच्या क्षमतेमध्ये या गोष्टी भर टाकतात. साऊंड डिझाइन हा एक सर्जनशील आणि निर्मितीच्या सर्व बाजू व्यापणारा कला प्रकार आहे. चित्रपट निर्मिती, टेलिव्हिजन निर्मिती, नाटक, लाइव्ह परफॉर्मन्स, व्हिडीओ गेम तयार करताना, साऊंड रेकार्ंडग आणि रिप्रॉडक्शन, पोस्ट-प्रॉडक्शन, रेडिओ आणि वाद्ये विकसित करणे अशासारख्या अनेकानेक क्षेत्रांमध्ये या कलेचा वापर होतो. साऊंड डिझाइनमध्ये सादरीकरण आणि आधीच ध्वनिमुद्रित आणि ध्वनिसंयोजित केलेल्या आवाजांचे संपादन या गोष्टींचा समावेश असू शकतो. मात्र अनेकदा त्यात अगदी शून्यातून ध्वनिनिर्मिती करावी लागते. अशाप्रकारे एक साऊंड डिझायनर या सर्व गोष्टींची एकत्र सांगड घालण्याच्या कामी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतो. सिनेमातील ध्वनिसंयोजनाच्या क्षेत्रातील थोर व्यक्तिमत्त्व वॉल्टर मर्च यांच्या कार्यपद्धतीतून हे स्पष्ट झाले आहे की, साऊंड डिझायनर ही एक अशी व्यक्ती असते, जी चित्रपटाच्या ऑडिओ ट्रकच्या सर्व बाजूंना, अगदी डायलॉग्जपासून ते साऊंड इफेक्टस् ध्वनिमुद्रित करण्यापर्यंत ते अंतिम ट्रकच्या रिरेकार्ंडगपर्यंत (मिक्सिंग) सर्व गोष्टींना जबाबदार असते.
साऊंड इंजिनीअरिंगमध्ये ध्वनींची निर्मिती, संपादन, रेकार्ंडग आणि बरेचदा खास सॉफ्टवेअर आणि उपकरणांचा वापर करून मल्टिचॅनेल साऊंड मिक्सेस तयार करण्याच्या कामी वापरण्यात येणाऱया गुंतागुंतीच्या यंत्रणांवर लक्ष केंद्रित केले जाते. आपली भूमिका परिणामकारकरीत्या पार पाडण्यासाठी साऊंड इंजिनीअरने तांत्रिक ज्ञानाच्या बाबतीत अत्यंत सक्षम असायला हवे व या यंत्रणा आणि त्याच्याशी संबंधित कामांचा क्रम यांच्यावर हुकुमत असायला हवी. या कामाचा अनुभव आणि यांत्रिक (analog) किंवा डिजिटल माध्यमांच्या सहाय्याने ध्वनिनिर्मिती आणि ध्वनीचा विशिष्ट गरजांनुसार विविध प्रकारे वापर करण्याचे प्रशिक्षण या व्यक्तीजवळ असणे आवश्यक असते.
स्वच्छ आणि अत्यंत समतोल अशा ध्वनीची निर्मिती करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा कौशल्य संच आणि ज्ञान यांची गरज असते. ध्वनिनिर्मिती आणि संयोजनाच्या कलेमध्ये रस असणाऱया आणि या विषयाशी संबंधित विविध तांत्रिक बाबी शिकून घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी साऊंड इंजिनीअरिंगचा कोर्स अत्यंत साजेसा आणि फायदेशीर ठरू शकतो.
हिंदुस्थानमध्ये सहा महिन्यांपासून ते वर्षभराच्या कालावधीसाठीचे अनेक डिप्लोमा स्तरावरील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. साऊंड इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी फिजिक्स आणि गणित या विषयांची पार्श्वभूमी असल्यास उत्तम. या अभ्यासक्रमांत विद्यार्थ्यांचा ध्वनि नामक पदार्थ ऊर्जेशी संबंध येतो व त्यासंबंधीची अनेक गणिते तसेच ध्वनिलहरींना विद्युत-ऊर्जेमध्ये रूपांतरित करणे या व अशा इतर अनेक तांत्रिक गोष्टींचा यात समावेश असतो. असे असले तरीही साऊंड इंजिनीअरने विशिष्ट माध्यमासाठी साजेशा ध्वनीची कल्पना करण्यासाठी व त्याची निर्मिती करण्यासाठी आपल्या सर्जनशील क्षमतांचाही विकास करणे अपेक्षित असते. त्यामुळे आवाजाची जाण असलेला चांगला कान तसेच संगीताचे ज्ञान व त्यातील रस या गोष्टी सर्जनशीलतेत भर टाकू शकतील.
हिंदुस्थानात तसेच परदेशात साऊंड इंजिनीअरिंगसाठी अनेक प्रशिक्षण संस्था आहेत. हिंदुस्थानमध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, ज्यांना भरपूर मागणी आहे. पुण्यातील फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटच्या चित्रपट शाखेअंतर्गत व टेलिव्हिजिन शाखेअंतर्गत हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत व ही हिंदुस्थानातील सर्वाधिक नावाजलेली संस्था आहे.
त्याचप्रमाणे सत्यजीत राय फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, कोलकाता, व्हिसलिंग वुडस् इंटरनॅशनल, मुंबई, एमआयटी स्कूल ऑफ फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन, पुणे, रामोजी ऍकॅडमी ऑफ फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन, हैदराबाद, एसएई टेक्नॉलॉजी कॉलेज (हिंदुस्थानात अनेक ठिकाणी या संस्थेच्या शाखा आहेत), अन्नपूर्णा कॉलेज ऑफ फिल्म ऍण्ड मीडिया, हैदराबाद अशा काही संस्थांमध्ये रेकार्ंडग आर्टस् (ऑडिओ इंजिनीअरिंग) या विषयाचे डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
साऊंड इंजिनीअरिंगच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांसाठी करीअरचे असंख्य मार्ग खुले होतात. त्यांना स्टुडिओ साऊंड इंजिनीअर, ऑडिओ इंजिनीअर, लाइव्ह साऊंड इंजिनीअर, साऊंड डिझायनर, मिक्सिंग इंजिनीअर, म्युझिक अरेंजर, मास्टरिंग इंजिनीअर, ऑडिओ पोस्ट -प्रॉडक्शन, डायलॉग आणि म्युझिक एडिटर, लोकेशन रेकॉर्डिस्ट, डिजिटल मीडिया उद्योजक, साऊंड रेकॉर्डिस्ट अशा अनेक फायदेशीर क्षेत्रांची दारे त्यांच्यासाठी खुली होतात.































































