
>> शमिका पुलकर्णी
सतत घरातून काम करणे, त्यात सगळी घरची कामं करणे आणि इतर घरच्या गोष्टींकडे लक्ष देणे हे सर्व मानसिक तणाव वाढवते. त्यामुळे या लॉकडाऊनमध्ये आक्सिएटी आणि तणाव वाढल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत.
आता हा तणाव
कसा कमी करावा?
- कामांचा क्रम ठरवून योग्य वेळेत कामे आटोपली तर तणाव कमी होण्यास मदत होते.
- पाण्याचा आणि आरोग्यदायी पेयांचा समावेश नियमित करावा. जसे पाणी, लिंबू सरबत, कोकम सरबत, आलं लिंबू सरबत, मसाला ताक, ग्रीन टी. यामुळे आपले मन उत्साही आणि शांत राहण्यास मदत होते. ऑसिडिटीचा त्रास होत नाही.
- सतत एका ठिकाणी बसल्याने आपल्याला थकवा जाणवतो म्हणून थोडय़ा थोडय़ा वेळाने घरातल्या घरात फिरावे. यामुळे मान पिंवा पाठदुखीचा त्रास कमी होतो.
- मानसिक आरोग्यासाठी नियमित योग पिंवा सूर्यनमस्कार पिंवा प्राणायाम पिंवा मेडिटेशनसारखे पर्याय योग्य आणि आरोग्यदायी ठरतात. याचा आपल्या मानसिक आरोग्यावर नक्कीच सकारात्मक परिणाम होतो. म्हणूनच हे सर्व उपाय करून घरून काम करूनही मानसिक तणाव कमी करावा आणि वर्प फ्रॉम होम सकारात्मक विचाराने पार पाडावे.




























































