भाजप निवडणूक जिंकण्याचे मशिन झालीय, विरोधक एकत्र आले तर पराभव शक्य; अरूण शौरींचे निरीक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप हे निवडणूक जिंकण्याचं मशीन झाली आहे आणि संघ फक्त एक मुखवटा बनून राहिला आहे, असं निरीक्षण माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांनी केलं आहे. जर सगळे विरोधक एकत्र आले तर भाजपचा पराभव शक्य आहे, असंही ते म्हणाले आहेत.

द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीदरम्यान त्यांना विचारण्यात आलं की, भाजपच्या आत किंवा बाहेर असं कुणी आहे का, जो भाजपला आव्हान देऊ शकेल? या प्रश्नावर शौरी म्हणाले, भाजपला अंतर्गत धोका नाही कारण त्यांच्याकडे एका अशा यंत्रणेचं पाठबळ आहे, जे अन्य कुठल्याही पक्षाकडे नाही. ते म्हणजे अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. संघाने कितीही दावा केला की त्यांची धोरणं भाजपमुळे पूर्ण झाली असली तरी आता संघ फक्त नामधारी मुखवटा बनून राहिला आहे. संघाचे दुसऱ्या फळीतले नेते आता मोदींच्या गटातले झाले आहेत, असं शौरी यावेळी म्हणाले.

भाजपला आव्हान देणं विरोधी पक्षांना जड जातं कारण, भाजप निवडणुका जिंकण्याचं मशिन झाली आहे. जोपर्यंत विरोधी पक्ष एकत्रितपणे लढत नाहीत, तोपर्यंत भाजपचा पराभव करणं कठीण आहे, असं मतही शौरी यांनी व्यक्त केलं आहे.