
अबकारी कर घोटाळा प्रकरणी ईडीने पाठवलेल्या सहाव्या समन्सलाही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टोलवले असून सारखे समन्स पाठवण्याऐवजी न्यायालयाने या प्रकरणी आदेश देईपर्यंत थांबावे, असे म्हटले आहे.
अबकारी कर घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी केजरीवाल यांना ईडीने समन्स पाठवून सोमवारी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र हे समन्सही केजरीवाल यांनी फेटाळून लावले. हे समन्स बेकायदा आहे. समन्सच्या वैधतेबाबत न्यायालयात सुनावणी सुरू असताना पुनःपुन्हा समन्स पाठवण्याऐवजी ईडीने न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी, असे आपने म्हटले आहे. आम्ही कायद्यानुसार या समन्सला उत्तर देत आहोत. आता ईडीने न्यायालयात या प्रकरणी खटला दाखल केला आहे. तेव्हा नवीन समन्स पाठवण्याआधी कोर्ट निर्णय देईपर्यंत त्यांनी थांबावे, असे केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत पत्रकारांना सांगितले.





























































