धामणगाव येथे कंटेनर उलटून क्लिनरचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर उलटून क्लीनरचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडे नऊच्या सुमारास तालुक्यातील धामणगावजवळ वळण रस्त्यावर घडली. श्रीकांत अंकुश माने (26 ) असे  त्याचे नाव असून तो आष्टी तालुक्यातील सुरुडी येथील रहिवासी आहे.

चालक परसराम मिसाळ, व क्लिनर श्रीकांत माने हे दोघे सुरुडी येथील असून ( क्र. MH 46, AR. 3777 ) हा कंटेनर घेऊन बीडकडे जात होते. तालुक्यातील धामणगावजवळ वळण रस्त्यावर झिंजुर्कॅ वस्ती नजीक चालक मिसाळ यांचा कंटेनरवरील ताबा सुटला. त्यामुळे कंटेनर उलटला. यात कॅबीनमधील क्लीनर श्रीकांत दबला गेल्याने जागीच मृत्यू झाला. साधारण पाच वर्षांपूर्वी श्रीकांत यांच्या वडिलांचा पुण्याजवळ अपघात झाला होता. यानंतर घरची जबाबदारी श्रीकांतवर आली होती. सुरुवातीला तो गावात गंवड्याच्या हाताखाली काम करायचा. मात्र दोन महिन्यांपासून तो कंटेनरवर क्लीनर म्हणून काम करत असे. घरातील कर्त्या पुरुषांचे अपघाती निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

श्रीकांतच्या पश्चात आई, पत्नी असा परिवार आहे. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पोपट मंजुळे करीत आहेत.