अश्विनी बिद्रे खून प्रकरण; अभय कुरुंदकर जामीन अर्जावर 11 जूनला सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अलिबाग

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून खटल्यातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्या जामीन अर्जावर 11 जून रोजी अलिबाग सत्र न्यायालयात न्यायाधीश एम जे. मल्लशेट्टी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. आरोपीविरोधात आरोप निश्चित करण्याबाबत विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी 3 जूनच्या सुनावणीवेळी युक्तिवाद केला होता. त्यावर आज आरोपी पक्षातर्फे उत्तर देण्यासाठी सुनावणी झाली. जामीन अर्ज व युक्तिवाद या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे चार्ज कोणते ठेवावेत याबाबत 11 जूनला सुनावणी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, दुसरा आरोपी राजेश पाटील याला दोषमुक्त करण्यास सरकारी वकील घरत यांनी आक्षेप घेतला.