फर्ग्युसन रस्त्यावर एटीएम मशीनची छेडछाड, ५ लाख रूपयांची चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

शहरातील वर्दळीच्या फर्ग्युसन रस्त्यावरील कॅनरा बँकेच्या एटीएम मशीनची छेडछाड करून चोरट्यांनी ५ लाख रूपयांची रोकड चोरून नेली. ही घटना १८ मार्चला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी श्रद्धा काकणे (वय ३०, रा. पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्ग्युसन रस्त्यावर कॅनरा बँकेचे एटीएम सेंटर आहे. १८ मार्चला एका महिलेसह दोघांनी एटीएम सेंटरमध्ये जाऊन मशीनची छेडछाड केली. त्यानंतर मशीनमधून ५ लाख रूपये काढून घेत चोरी केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस तपास करीत आहेत.