
शिंदखेडय़ाचे भाजपचे आमदार व माजी मंत्री जयकुमार रावल यांच्यावर दोंडाई पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दसऱ्याच्या दिवशी दोंडाई येथे रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आदिवासी संघटनेचा विरोध होता. त्यातून रावणाच्या पुतळ्याची आदिवासींकडून तोडफोडही करण्यात आली. त्याचवेळी आदिवासी बांधवांनी आपला विरोध व्यक्त करत कार्यक्रमाचे आयोजक जयकुमार रावल यांना जाब विचारला असता रावल यांनी जातीवाचक शिवीगाळ केली, असा आरोप आदिवासी संघटनांनी केला असून तशी तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. त्याआधारे पोलिसांनी जयकुमार रावल, त्यांचे वडील सरकार साहेब रावल यांच्यासह 20 जणांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

































































