
सामना प्रतिनिधी । नगर
नगरमध्ये पालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसैनिकावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली असून तणावपूर्ण शांतता आहे. सागर थोरात असे या शिवसैनिकाचे नाव असून १० ते १५ जणांनी त्याच्यावर हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे संपर्क भाऊ भाऊ कोरगावकर, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, दत्तात्रेय कावरे, लोखंडे यांच्यासह शिवसैनिक जिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत.
नगरमधील केडगावमध्ये दोन शिवसैनिकांची हत्या झाली होती, त्याचा तपास सुरू आहे. त्यात पुन्हा शिवसैनिकावर हल्ला झाल्याने सामान्य शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.


























































