Aus Vs Pak ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा मालिका विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, अबुधाबी

बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुमार प्रदर्शन करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानला हिंदुस्थानात वन डे मालिकेत पराभूत केल्यानंतर आता पाकिस्तानला धूळ चारण्याची करामत करून दाखवली. ऑस्ट्रेलियाने तिसरा वन डे सामना 80 धावांनी जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. कर्णधार ऍरोन फिंचची आणखी एक दमदार खेळी… पीटर हॅण्डस्कोम्बची शानदार फलंदाजी… ग्लेन मॅक्सवेलची अष्टपैलू चमक… अन् पॅट कमिन्स, ऍडम झाम्पासह सर्व गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर कांगारूंनी हा विजय मिळवला. पॅट कमिन्सची या लढतीत ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली.

ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या 267 धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानचा डाव 186 धावांमध्येच गडगडला. इमाम उल हकने 46, शोएब मलिकने 31 , उमर अकमलने 36, इमाद वासीमने 43 धावांची खेळी साकारली.