पोलिसांसमोर जोरात पादणं पडलं महागात, वाचा काय झाले त्या तरुणासोबत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रियातल्या एका माणसाला पोलिसांकडे पाठ करून पादणे चांगलेच महागात पडले आहे. त्याच्या या कृत्यामुळे त्याला 9 हजारांचा दंड भरावा लागला आहे. हे प्रकरण 20 जून 2020 चे असून न्यायालयाने आता त्यावर निर्णय सुनावला आहे.

ऑस्ट्रियातील विएन्ना येथे हा विचित्र प्रकार घडला आहे. हा माणूस एका बागेत आपल्या मित्रांसोबत बसला होता. दरम्यान तिथे काही पोलीस आले आणि त्यांनी ओळखपत्राची तपासणी सुरु केली. तपास सुरु असताना हा माणूस पोलीसांजवळ जाऊन जाणूनबूजुन जोरात पादला. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्यावर सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे पादणे अशोभनीय असल्याचे सांगत त्याला 45 हजारांचा दंड ठोेठावला. त्यावेळी या घटनेची जगभरात चर्चा झाली होती.

मात्र या दंडाच्या रकमेविरोधात या माणसाने कोर्टात धाव घेतली. त्याने पादणे ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याचा युक्तीवाद न्यायालयात केला. जरी ते जाणूनबुजून केलेले कृत्य असेल तरी तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे म्हणून पादण्याच्या क्रियेला स्वीकारले पाहिजे असे त्याचे म्हणणे होते. अखेर कोर्टाने त्याला थोडा दिलासा दिला आहे. त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती पाहून तसेच त्याचा कोणताही गुन्हेगारीचा रेकॉर्ड नसल्याने न्यायालयाने त्याच्या दंडाची रक्कम कमी करुन नऊ हजार केली.