Hyundai ची एसयूव्ही निघाली दमदार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले 5 स्टार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्राची XUV700 ही देशातील सर्वात सुक्षित कार आहे. मागील आठवड्यात झालेल्या क्रॅश टेस्टमध्ये या कारला 5 स्टार रेटिंग मिळाली होती. आता याच्याच पाठोपाठ दक्षिण कोरियाची प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी Hyundai ची Tucson एसयूव्ही ही या क्रॅश टेस्टमध्ये पास झाली आहे. न्यू जनरेशन Tucson एसयूव्हीला कंपनीने सप्टेंबर महिन्यात लॉन्च केली होती. याची बिल्ड कॉलिटी अत्यंत चांगल्या दर्जाची आहे.

5 स्टार सेफ्टी रेटिंग

चौथ्या जनरेशन Tucson एसयूव्हीला Euro NCAP ने केलेल्या क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टारची सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. या एसयूव्हीने ऍडल्ट प्रोटेक्शन आणि चाईल्ड प्रोटेक्शन कॅटगरीमध्ये 87 टक्के गुण मिळाले आहे. या टेस्टिंग केलेल्या मॉडेलमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ABS, सीटबेल्ट रिमाइंडर, फ्रंट सीटबेल्ट प्रीटेन्शनर्स सारखे फीचर्स देण्यात आले आहे.

किंमत आणि इंजिन

या कारची प्रारंभिक किंमत 22.57 लाख रुपयांपासून सुरु होते, जी 27.35 लाखांपर्यंत जाते. यात 2.0- लिटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन देण्यात आले आहे. याचे पेट्रोल इंजिन 6-स्पीड AT ट्रान्समिशनसह जोडण्यात आले आहे. तर याचे डिझेल इंजिन 6-स्पीड AT ऐवजी 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. याचे पेट्रोल इंजिन 152PS आणि 192Nm जनरेट करतो. तर याचे डिझेल इंजिन 185PS आणि 400Nm जनरेट करतो.