देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी लवकरच आपली लोकप्रिय Alto नवीन अवतारात लॉन्च करणार आहे. ही कार या वर्षाच्या शेवटी लॉन्च केली जाऊ शकते. नवीन Alto लाइटवेट हार्टटेक्ट प्लॅटफॉर्मवर तयार केली जाणार आहे.
सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या Alto मध्ये दोन इंजिन पर्यायात उपलब्ध आहे. ज्यात 660cc चे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 49bhp ची पॉवर जनरेट करते. तसेच ही कार 660cc टर्बोचार्ज्ड इंजिन पर्यायातही उपलब्ध आहे. जे 64bhp पॉवर जनरेट करते. या इंजिनमध्ये सुझुकीची स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजी असेल जी या कारला अधिक मायलेज देण्यास मदत करेल.
नवीन Alto मध्ये कंपनी 796cc चे इंजिन देऊ शकते. जे 48bhp ची पॉवर 69Nm टॉर्क जनरेट करेल. या इंजिनमध्ये सुझुकीची स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजी देखील असू शकते. कंपनी याची किंमत 5 लाख रुपये इतकी ठेवू शकते. असं असलं तरी कंपनीने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.



























































