प्लॅस्टिक कचऱ्याविषयी जनजागृती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बोटल्स फॉर चेंजने शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये वापरलेल्या प्लॅस्टिकचा पुनर्वापर आणि प्लॅस्टिक कचरा वेगळे ठेवण्याविषयी जनजागृती मोहीम राबवली आहे. शहरातील 20 हून अधिक झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन तेथे वापरलेल्या प्लॅस्टिकची योग्यरीत्या विल्हेवाट लावण्याच्या पद्धतींबाबत लोकांना माहिती देण्यात आली. बिस्लेरीने हा उपक्रम हाती घेतला असून लहान मुलांपासूनच या जागरूकतेचा प्रसार करण्याला सुरुवात केली आहे. बिस्लेरीने मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील नऊ विभिन्न झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांसाठी विशेष जागरूकता सत्रांचे आयोजन केले. या उपक्रमाला 300 हून अधिक कुटुंबांचा सहभाग दिसला आणि हा उपक्रम 150 हून अधिक मुलांपर्यंत पोहोचला. या मोहिमेअंतर्गत एकूण 200 किलोग्रॅमहून अधिक कठीण व सौम्य प्लॅस्टिक साहित्य गोळा करण्यात आली.