
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रथमच देशात अयोध्यानगरीच्या धन्नीपूर गावात विशाल मशीद उभारण्यात येत आहे. या मशिदीसाठीच्या देणग्यांना आयकर सवलत मिळत नसल्याने देणगीदारांनी आपला हात आखडता घेतल्याचे मशीद उभारणाऱया इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनचे प्रवक्ता अतहर हुसैन यांनी स्पष्ट केले आहे. या मशिदीच्या संकुलात 200 खाटांचे भव्य रुग्णालय, वाचनालय आणि संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने फाऊंडेशनला 5 एकर जमीन दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर 2019ला अयोध्येतील राममंदिराचा ऐतिहासिक निकाल देताना मशिदीसाठीही जवळच 5 एकर जमीन देण्याचे आदेश उत्तर प्रदेश सरकारला दिले होते.




























































