अयोध्या निकाल – निर्मोही आखाड्याने देखील सर्वोच्च न्यायालयात केली पुनर्विचार याचिका

390
supreme-court

अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबरला ऐतिहासिक निकाल देत ती जागा प्रभू श्री रामाची असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या निर्णयानंतर राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र या निकालाविरोधात ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल बोर्डाने पुनर्विचार याचिका दाखल केलेली असतानाच निर्मोही आखाड्याने देखील सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. निर्मोही आखाड्याचे प्रवक्ते कार्तिक चोप्रा यांनी ही माहिती दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जागेबाबत दिलेल्या निकालानंतर तिथे राम मंदीर निर्माणाचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने केंद्र सरकारला मंदीर उभारणीसाठी एका ट्रस्टचे गठन करण्याचा आदेश दिला आहे. या ट्रस्टमध्ये निर्मोही आखाड्याला स्थान देण्यात येऊ नये असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात निर्मोही आखाड्याने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या