बी.फार्मसी सत्र-7 परीक्षेचा निकाल जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या हिवाळी सत्राच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या बी.फार्मसी सत्र-7 या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. बी.फार्मसीच्या परीक्षेमध्ये एकूण 2276 विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला 2 हजार 854 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 हजार 840 एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. तर 14 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत 563 विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले.

या परीक्षेत अचूकतेसाठी स्टिकर व ऑनलाईन उपस्थिती पद्धत यशस्वी झाली असून कोणताही निकाल राखीव ठेवण्यात आलेला नाही, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले. विद्यापीठाने आजपर्यंत 2024 च्या हिवाळी सत्राचे 23 निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेचे निकाल http://www.mumresults.in/ या वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आले आहेत.