
देशभरात संविधान दिन साजरा होत असताना बुधवारी फ्रान्समध्ये महाराष्ट्रासह देशाची मान अभिमानाने उंचावणारी घटना घडली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पॅरिसमधील युनेस्कोच्या मुख्यालयात अनावरण करण्यात आले. हा पुतळा महाराष्ट्र सरकारकडून भेट देण्यात आला आहे.






























































