
पालिकेच्या माध्यमातून सुरू झालेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उपक्रमात गेल्या सहा महिन्यांत आतापर्यंत तब्बल आठ लाख जणांनी मोफत उपचार घेतले आहेत. या ठिकाणी उच्च रक्तदाब, मानसिक आरोग्य, मधुमेह यासारख्या विविध आजारांवर उपचार आणि चाचण्यांची मोफत सुविधा उपलब्ध आहे.
मुंबईत 17 नोव्हेंबर 2022 रोजी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. सद्यस्थितीत मुंबई शहर आणि उपनगरातील 156 आपला दवाखान्यात आतापर्यंत 8,01,233 नागरिकांनी विविध आरोग्य सुविधांचा लाभ घेतला आहे. यापैकी पॉलीक्लिनिक व डायग्नॉस्टिक पेंद्रे येथे 32,918 रुग्णांनी दंत चिकित्सा, स्त्र्ााrरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचारोगतज्ञ अशा विविध तज्ञांच्या उपचार सुविधेचा लाभ घेतला. तर आपला दवाखाना येथे 7,68,315 रुग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार याचा लाभ घेतला आहे. या आरोग्य पेंद्रांमध्ये हायपर टेन्शन आणि डायबेटीस तपासण्यात येणार असून डोळय़ांची तपासणी, आवश्यक उपचार आणि गरज भासल्यास मोठय़ा रुग्णालयात शस्त्रक्रिया केली जात असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
147 प्रकारच्या चाचण्या, रात्री 10 पर्यंत सुविधा
मुंबईच्या झोपडपट्टी भागातील गोरगरीबांना घरापासून केवळ दहा मिनिटांच्या अंतरावर दर्जेदार आणि मोफत उपचार मिळावेत यासाठी पालिकेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य पेंद्र उपक्रम सुरू केला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी पालिकेकडून खासगी आणि नामांकित प्रयोगशाळांशी करार करून विविध प्रकारच्या 147 चाचण्या मोफत केल्या जात आहेत. ही आरोग्य पेंद्रे रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असल्यामुळे कामावरून उशिरा घरी येणाऱया सर्वसामान्यांनाही मोठा फायदा होत आहे.






























































