हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रावर 24 तास सुरक्षा, गोरगरीबांच्या आरोग्यासाठी पालिका सतर्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पवईत भूमाफियांकडून जागा बळकावलेल्या ठिकाणी पालिकेने तातडीने कार्यवाही करून या ठिकाणी दवाखाना सुरू केला आहे. तर यापुढे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांच्या ठिकाणी 24 तास सुरक्षा रक्षक तैनात ठेवण्यात येणार असून ‘सीसीटीव्ही’चा पहाराही राहणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.

गोरगरीबांना घराजवळच पालिकेचे दर्जेदार आणि मोफत उपचार मिळावेत यासाठी पालिकेने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद’ उपकम सुरू केला आहे. यामध्ये एकूण 250 आरोग्य केंदे सुरू करण्यात येणार आहेत. यातील 52 आरोग्य मुंबईतील विविध झोपडपट्टी भागात सुरूही झाली आहेत. या ठिकाणी दररोज शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये पवईमधील तुंगा परिसरातील आरोग्य केंदाच्या जागेवर भूमाफियांनी जबरदस्तीने आणि बेकायदेशीर मार्गाने कब्जा केला होता. विशेष म्हणजे जागेवर कब्जा केल्यानंतर या ठिकाणी बाऊन्सर्स ठेवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यामुळे या ठिकाणी डॉक्टर आणि उपचारासाठी रुग्ण येणार कसे असा प्रश्न निर्माण झाल्याने गोरगरीबांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. याची दखल घेत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जोरदार आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने आज पोलिसांच्या सहाय्याने संबंधित ठिकाणाच्या भूमाफियांना हटवले. या ठिकाणचे आरोग्य केंदही आता सुरू करण्यात आले आहे.

शिवसेनेच्या आंदोलनाला यश
गोरगरीबांसाठी सुरू केलेल्या आरोग्य केंद्राची जागा भूमाफियांनी बळकावल्याचे समोर येताच शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक माटेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठय़ा संख्येने शिवसैनिक-पदाधिकारी, महिला, रहिवासी उपस्थित होते. या ठिकाणच्या घुसखोरांना हटवून आरोग्य केंद्र सुरू केले नाही तर आरोग्य केंद्राचे टाळे आम्ही तोडू आणि आयुक्तांच्या दालनात आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून या ठिकाणचे आरोग्य केंद्र सुरू केले आहे.