7, 9 ऑगस्ट रोजी वरळी-दादरमध्ये बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
subhas-desai-in-job-fair

सामना प्रतिनिधी  । मुंबई

वरळी आणि दादर या परिसरात येत्या 7 व 9 ऑगस्ट रोजी बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे समन्वय मुंबई शहर जिल्हाधिकारी शिकाजी जोंधळे यांच्या मार्गदर्शनात होणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती मेळाव्यात राहणार आहे.

राज्यभरात विविध ठिकाणी बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यांना युवकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. दिनांक 7 ऑगस्ट रोजी डोम, एन.एस.सी.आय. सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, लाला लाजपतराय मार्ग, वरळी येथे तर  9 ऑगस्ट रोजी सूर्यवंशी सभागृह, वीर सावरकर मार्ग, दादर पश्चिम येथे हे मेळावे होणार आहेत. ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने इच्छुक उमेदवार 6 ऑगस्टपर्यंत वरळी तर 8 ऑगस्टपर्यंत दादर येथील मेळाव्यासाठी नोंदणी करू शकतात.  स्थानिक विधानसभा सदस्य सदा सरवणकर, सुनील शिंदे यांच्या पुढाकाराने हे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.