टकल्यांसाठी खुशखबर; टकलावर पुन्हा केस उगवता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क

सौंदर्य खुलवण्यात केस महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे महिला आणि पुरूष केसांची विशेष काळजी घेतात. पण कधी कधी आवश्यक ती काळजी घेऊनही केस अकाली गळू लागतात व डोक्याला टक्कल पडतं. मग अशावेळी विग लावून केसांची कमतरता पूर्ण करावी लागते. पण न्यूयॉर्कमधील संशोधकांनी टकलावर पुन्हा नव्याने केस उगवता येणं शक्य असल्याचा दावा केला आहे.

न्यूयॉर्क स्कूल ऑफ मेडिसीनच्या संशोधकांनी नुकतच एक संशोधन केलं. यासाठी डोक्यातील Sonic Hedgehog Pathway या पेशींवर प्रक्रिया करून त्यांना सक्रिय करण्यात आलं. हे संशोधन उंदरांवर करण्यात आले आहे. यात मूल आईच्या गर्भात असताना Sonic Hedgehog या पेशी जास्त सक्रीय असतात. यामुळे केसांजवळील कोषिकांची निर्मिती होते, असे दिसून आले. पण जर डोक्याच्या त्वचेला जखम झाल्यास, वय वाढल्यावर या कोषिकांची निर्मिती आपोआपच बंद होते. यामुळे जगभरात पंचविशी ओलांडलेल्या तरुणांचे केस अकाली गळायला लागतात. तर ४० टक्के महिलांचे केस त्यांनी चाळीशी पार केल्यावर गळायला लागतात, असे संशोधकांच्या निदर्शनास आले.

दरम्यान, या संशोधनासाठी उंदरावर प्रयोग करण्यात आला होता. यासाठी उंदराची खराब त्वचा आणि फायब्रोब्लास्ट नावाच्या कोषिकांची चाचणी करण्यात आली. त्यावेळी कोषिकांमधून कोलेजन या एक प्रकारच्या प्रोटीनचा स्त्राव होत असल्याचे दिसून आले. (हे प्रोटीन केसांना रंग व आकार देण्याचे काम करते) त्यानंतर संशोधक डॉक्टर मायूमी इटो यांनी डोक्यातील Sonic Hedgehog ला सक्रीय केले असता कोषिकांही सक्रीय झाल्याचे समोर आले. नंतर चार आठवड्यात उंदराच्या ज्या त्वचेवरील केस गळाले होते. तिथे पुन्हा नव्याने केस उगवल्याचे दिसले. याबद्दल नेचर कम्युनिकेशन जर्नलमध्ये लेखही प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा प्रयोग माणसांवरही करता येणे शक्य असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.