बोडो बंडखोरांच्या एनडीएफबी संघटनेवर पुन्हा 5 वर्षे बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने आसाम राज्यात विघातक कारवाया करणार्‍या बोडो बंडखोरांच्या नॅशनल डेमॉक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलॅण्ड (एनडीएफबी) या संघटनेवरील बंदीत आज पुन्हा ५ वर्षांनी वाढ केली आहे. हत्या, खंडणी वसुली यासह एकात्मतेला आव्हान देणार्‍या देशविरोधी कारवाया एनडीएफबी करीत असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे. नॅशनल डेमॉक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलॅण्ड (एनडीएफबी) संघटना बेकायदा आणि हिंसक कारवाया करीत आहे. स्वतंत्र बोडोलॅण्डसाठी देशाच्या एकात्मतेला आव्हान देत आहे, असे ईशान्येतील या संघटनेवरील बंदी अधिसूचनेत स्पष्ट केले आहे. हिंदुस्थानच्या शत्रू देशाकडून एनडीएफबी सर्वतोपरी मदत व शस्त्रास्त्र मिळवित आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे.