मुंबईत ६०० किलोंची प्लॅस्टिक सर्जरी, ८६७ दुकानांवर धाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्यात २३ जूनपासून प्लॅस्टिकबंदीची १०० टक्के अंमलबजाकणी सुरू झाल्यानंतर पहिल्या दिकशी जनजागृती करून ‘सबुरी’ दाखवणाऱया मुंबई महानगरपालिकेने आज धडक कारवाई करीत तब्बल ८६७ दुकानांवर धाडी घालून तीन लाख ३५ हजारांवर दंड वसूल केला. यामध्ये ६०० किलो प्लॅस्टिक जप्तही करण्यात आले. उद्यापासून ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असून नागरिकांकडे प्लॅस्टिक पिशवी आढळल्यास पाच हजारांचा दंड केला जाणार आहे.

प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी लागू झाल्यानंतर पहिल्या दिवशी पालिकेने २४ विभागांत २३ कारवाई पथकांच्या सहाय्याने जनजागृती केली. यामध्ये काही व्यापारी, दुकानदार, नागरिकांना समजही देण्यात आली, तर अरेरावी करणाऱया मॅक्डोनाल्डसारख्या काही आस्थापनांकडून पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला. रविवारी सुट्टीच्या दिवशी कारवाई पथकातील अधिकारी-कर्मचाऱयांनी उपस्थित राहून चेंबूर परिसरात धडक कारवाई केली. पालिकेचा परवाना विभाग, बाजार विभाग आणि दुकाने व आस्थापना विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू असल्याने कारवाई झालेल्या दुकानांची संख्या आणि दंडाचा आकडा वाढणार आहे.

कारवाईसाठी २६९ निरीक्षकांची फौज

महापालिकेकडून सुरू असलेल्या या कारवाईसाठी २६९ निरीक्षकांचे पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकातील तीन-तीन निरीक्षकांचा गट करून कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईत गैरव्यवहार टाळण्यासाठी निरीक्षकांना निळय़ा रंगाचा कोट आणि काळय़ा रंगाची टोपी असलेला गणवेश देण्यात आला आहे.

नागरिकांकडून केवळ दंड कसूल करणे हा पालिकेचा हेतू नाही. तर पर्यावरण रक्षणासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे, त्यांचा सहभाग वाढवणे हा आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने वरळीत आयोजित प्रदर्शनात एकाच व्यासपीठावर अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. प्लॅस्टिकबंदीला मुंबईकरांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद कौतुकास्पद आहे.
– अजोय मेहता, पालिका आयुक्त

८६७ दुकानांवर धाडी टाकल्या असता ७२ दुकानांमध्ये प्लॅस्टिक पिशव्या आढळून आल्या. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

५ दुकानदारांनी दंड भरण्यास नकार दिला असून त्यांच्या विरोधात पुढील कारवाई लवकरच करणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ठाण्यात दुसऱ्या दिवशी ६० हजारांचा दंड वसूल

रविवार सुट्टी असूनदेखील ठाणे महानगरपालिकेने प्लॅस्टिकविरोधातील मोहीम सुरूच ठेवली. दुसऱया दिवशी एकूण १०० किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून ६० हजारांचा दंड वसूल केला आहे. कळवा, मुंब्रा येथील मार्केटमध्ये तसेच दुकानांमध्ये जाऊन महापालिकेच्या विशेष पथकाने झडती घेतली. त्यात प्लॅस्टिकच्या पिशव्या ठेवणाऱयांवर कारवाई करण्यात आली. पालिका क्षेत्रातील गृहनिर्माण सोसायटय़ांमध्ये राहणाऱया नागरिकांनादेखील प्लॅस्टिक वापरू नका, असे आवाहन करण्यात आले. काही इमारतींमध्ये असलेले प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहेत.

सर्वसामान्य खूश, व्यापाऱ्यांची नाराजी

प्लॅस्टिकला असलेल्या पर्यायांची माहिती देण्यासाठी वरळीच्या नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडियाच्या स्टेडियममध्ये महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या प्रदर्शनास पहिल्या दिवशी नऊ हजार, दुसऱ्या दिवशी साडेसात हजार तर तिसऱया दिवशीही हजारो नागरिकांनी उपस्थित राहून प्रतिसाद दिला. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकला उपलब्ध असलेले पर्याय पाहून समाधान व्यक्त होत आहे. मात्र पॅकेजिंगच्या खाण्याच्या पदार्थांना अद्याप ठोस पर्याय नसल्याने व्यापारी नाराजी व्यक्त करीत असल्याचे प्रदर्शनाचे समन्वयक आणि सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले. मात्र याबाबतही राज्य शासनाकडून लककरच योग्य निर्णय दिला जाईल अशी अपेक्षाही त्यांनी क्यक्त केली.

कुकर घेऊनच मटणाच्या दुकानात

रविवार म्हणजे सामीष भोजनाचा दिवस. मच्छी, मटण किंवा गेला बाजार अंडी ठरलेली. प्लॅस्टिकबंदीमुळे अंडी आणण्याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. प्रश्न होता तो मच्छी आणि मटणाचा. लोकांनी हा प्रश्न चुटकीसरशी सोडवला. काहींनी स्टीलचे डबे घेऊन बाजार गाठला तर काहींनी चक्क कुकर घेऊनच मटणाचे दुकान गाठले. म्हणजे मटण आणा, स्वच्छ करा, शिजवा ही भानगडच नको.