फाटलेल्या नव्या नोटा बदलून मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

नव्याने चलनात आलेल्या दोनशे, पाचशे आणि दोन हजार रुपयांची नोट फाटली तर काय करायचे, हा प्रश्न सर्वांसमोरच उभा होता. मात्र या नव्या नोटा फाटल्यास आता बँकांमध्ये बदलून मिळणार आहेत. त्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने खराब आणि फाटलेल्या नोटा बदलून देण्याबाबत रिझर्व्ह बँकेने पाठवलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.