बीडमध्ये औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्ताला लाच घेताना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त कृष्णा दाभाडे यांना 35 हजार रुपयांची लाच घेताना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. पथकाने त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त कृष्णा दाभाडे वर्षभरापासून बीडमध्ये कार्यरत आहेत. कारवाईचा बडगा दाखवत त्यांनी व्यवसायिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. अनेक हॉटेलवर विनाकारण धाड टाकली होती. अखेर त्यांना शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.