गोदावरी नदी बंधाऱ्यावरुन व गाडीरस्त्याने येणाऱ्या वाटा प्रशासनाने केल्या बंद!

899

कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनाने सीमा बंदी करूनही आडमार्गाने येण्याची नामी शक्कल काही महाभागांनी लावली आहे. बीड जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आता आड मार्गातील बंधारे व गाडी रस्ते प्रशासनाने जेसीबी या यंत्राचा वापर करून तर काही ठिकाणी झाडे आडवे लावून तसेच काही ठिकाणी रस्ते खोदून हिंगणगाव – पाथरवाला , तसेच नागझरी व मौजे बोरगाव थडी येथे जोगला देवी बंधाऱ्यावरिल रस्ता बंद करण्यात आला आहे.

बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यात कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न चालू केले आहेत. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी जिल्ह्यात कडक नियमांची अंमलबजावणी चालू केलेली असताना  व सगळीकडे पोलीस यंत्रणा जिल्ह्यातील व्यक्ती बाहेर जाऊ नये व बाहेरचा जिल्ह्यात येऊन ह्यासाठी सतर्कता नाही काहीजणांनी गेवराई तालुक्याच्या गोदावरी नदीच्या उच्च व निम्न पातळीच्या बंधाऱ्याचा मार्ग अवलंबिला होता या मार्गावरून बीड जिल्ह्यात शिरकाव करण्यात येत होता. म्हणून प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांनी तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी अशा आड मार्गातून येणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी सोमवारी रस्त्यांचे खोदकाम करुन जेसीबी द्वारे खड्डे करून हे रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे या मार्गातून येणाऱ्या महाभागांना कायद्याचे उल्लंघन करून बीड जिल्ह्यात आता शिरकाव  करता येणार नाही.

हिंगणगाव – पाथरवाला, तसेच नागझरी व  मौजे बोरगाव थडी येथे जोगला देवी बंधाऱ्यावरिल रस्ता बंद करण्यात आला, मौजे मनुबाई जवळा येथे मंगरूळ उच्च पातळी बंधाऱ्यावरिल रस्ता बंद करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या