
बीड जिल्ह्यात सोमवारी पुन्हा 85 रूग्ण आढळून आले तर मृत्युच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. मृत्युची संख्या 104 वर जाऊन पोहचली. काल 85 कोरोनाग्रस्तात 20 रूग्ण बीड शहरातील आहेत. आता एकूण रूग्णांची संख्या 4177 वर पोहचली आहे. 2131 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 1842 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
बीड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी बीड जिल्ह्यामध्ये 85 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले तर जिल्हाभरात कोरोनाने पाच जणांचा बळी गेला. एकुण मृत्युची संख्या 104 झाली आहे. बीड जिल्ह्यामध्यें कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडाही दिलासायदायक आहे. कालपर्यंत एकुण 2131 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता 1842 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. काल सापडलेल्या 85 रूग्णांमध्ये बीड 20, अंबाजोगाई 15, धारूर 7, गेवराई 4, केज 6, माजलगाव 6, परळी 9, पाटोदा 2, आष्टी तालुक्यात 16 चा समावेश आहे.
कारागृहातच कोव्हिड सेंटर
बीड जिल्ह्याच्या कारागृहात 234 कैद्यांची रविवारी अॅन्टिजेन तपासणी केल्यानंतर 59 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यातील 8 कैद्यांना कोव्हिड कक्षात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव उर्वरित 51 जणांवर कारागृहातीलच एका बॅरिकेटमध्ये उपचार सुरू केले आहेत. आरोग्य विभागाची एक टिम कैद्यांच्या उपचारासाठी नेमण्यात आली आहे. कारागृहातीलच एक बॅरिकेटर्स कोव्हिड वार्ड झाला आहे.





























































