देशात सर्वाधिक पगार बंगळुरूत;मुंबई दुसऱ्या स्थानी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बंगळुरू

हिंदुस्थानात सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्या या हार्डवेअर ऍण्ड नेटवर्किंग, सॉफ्टवेअर ऍण्ड आयटी सर्व्हिसेस आणि कन्झ्युमर सेक्टरमध्ये असून सर्वाधिक पगार बंगळुरूत मिळतो. त्यानंतर मुंबई आणि दिल्लीचा क्रमांक लागतो, असे ‘लिंक्डइन’ने केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.

‘लिंक्डइन’ने पहिल्यांदाच देशात सर्वाधिक वेतनासंदर्भात सर्व्हे केला. यात ही बाब समोर आली आहे. आयटी हब अशी ओळख असलेल्या बंगळुरूत सर्वाधिक वेतन मिळते. त्यानंतर मुंबई आणि दिल्लीत नोकरदारांना सर्वाधिक वेतन मिळते असे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. अहवालानुसार हार्डवेअर ऍण्ड नेटवर्किंग या क्षेत्रातील नोकरदारांना 15 लाख रुपये वार्षिक वेतन दिले जाते. तर सॉफ्टवेअर क्षेत्रातील नोकरदारांना 12 लाख आणि कन्झ्युमर क्षेत्रातील नोकरदारांना नऊ लाख रुपये वार्षिक वेतन दिले जाते. त्यामुळे गलेलठ्ठ पगाराच्या शर्यतीत बंगळुरूच टॉपवर आहे.

पाच महानगरांतील वार्षिक पगाराचे पॅकेज

बंगळुरू   11,67,337 रुपये

मुंबई        9,03,929  रुपये

दिल्ली/ एनसीआर   8,99,486  रुपये

हैदराबाद       8,45,574 रुपये

चेन्नई        6,30,920  रुपये