चला, बर्मुडा ट्रँगल फिरायला, जहाज गायब झाल्यावर पूर्ण रक्कम परत; ब्रिटनच्या कंपनीची अजब ऑफर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अटलांटिक महासागरातील बर्मुडा ट्रँगलबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. या त्रिकोणी पट्टय़ात कित्येक लहान-मोठी जहाजे, विमाने गायब झाली आहेत. त्यामुळे लोक या रहस्यमय भागातून प्रवास करायला घाबरतात, मात्र ब्रिटनच्या एका पंपनीने लोकांना अजिब ऑफर दिलेय. बर्मुडा ट्रँगलमध्ये अनेक जहाजे गायब झाली आहेत, मात्र आम्ही जे जहाज तयार केलंय, ते बर्मुडा ट्रँगलमधून परत यायची खात्री देतं. जर जहाज परत आलं नाहीच तर आम्ही प्रवाशांना पूर्ण रक्कम परत देणार, असं पंपनीने सांगितलंय.

नॉर्वेजियन प्राइमा पंपनीने बर्मुडा ट्रँगल टुरसाठी पॅकेज जाहीर केलेय. त्याअंतर्गत प्रवाशांना दीड लाख रुपये द्यावे लागतील. या पॅकेजमध्ये एक व्यक्ती पाच दिवस आणि पाच रात्र प्रवास करून धोकादायक मानल्या जाणाऱया बर्मुडा ट्रँगलवर पोचतील.

– बर्मुडा ट्रँगल हा अटलांटिक महासागरातील पाच लाख चौरस किलोमीटरचा भाग आहे. त्याचा आकार त्रिकोणी आहे. मागील 100 वर्षांत यामध्ये 75 विमाने आणि 100 हून अधिक लहान-मोठी विमाने गायब झाली आहेत. या घटनांमध्ये एक हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. म्हणून हा भाग भीतीदायक आहे.