
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-1 टर्मिनल 2 यांना जोडणारी बेस्टची बससेवा उद्या 7 एप्रिलपासून सुरू करण्यात येत आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत आणि आंतरदेशीय विमानसेवा कार्यान्वित करण्यात येते या विमानतळावर अतिरराष्ट्रीय तसेच आंतरदेशीय विमान उड्डाणांकरीता वेगवेगळी टर्मिनल असून सदर टर्मिनल्स टर्मिनल – 1 व टर्मिनल – 2 या नावाने ओळखली जातात.
अनेक प्रवासी टर्मिनल-1 वरुन टर्मिनल अथवा विरूद्ध दिशेने विमान बदल करून प्रवास करणारे असतात. अशा प्रवाशांना या दोन टर्मिनलच्या दरम्यान किफायतशीर बससेवा उपलब्ध होण्याकरीता गुरुवार दि. 7 एप्रिल 2022 पासून बेस्ट उपक्रमाची वातानुकूलित बससेवा सुरु करण्यात येत आहे. ही बससेवा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल-2 आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरदेशीय विमानतळ टर्मिनल-1 दरम्यान दिवसाचे 24 तास आणि दर 20 ते 30 मिनिटांच्या अंतराने संपूर्ण आठवडा सुरू राहील. या बससेवेचे 50 रु. इतके प्रवासभाडे आकारण्यात येईल असे बेस्ट उपक्रमाने म्हटले आहे.

























































