लेख – वादळी रूपगर्विता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिलीप जोशी << [email protected] >>

विविध क्षेत्रांतील विश्वविख्यात व्यक्तींच्या मालिकेत या वेळी एका वादळी रूपगर्वितेविषयी. डेम एलिझाबेथ टेलर ऊर्फ लिझ टेलर. हॉलीवूडची एकेकाळची दोन ऑस्कर आणि एक ‘गोल्डन ग्लोब’ विजेती सौंदर्यवती. एलिझाबेथ टेलर जितकी तिचं सौंदर्य, चित्रपट-नाटकातला अभिनय यासाठी गाजली तेवढीच, किंबहुना जास्तच चर्चा तिच्या आठ विवाहांची झाली. त्यातही एका नवऱ्याशी घटस्फोट घेऊन तिने वर्षभरातच पुनर्विवाह केला. दागिन्यांची शौकिन असलेल्या लिझचे सात नवऱ्यांबरोबरचे आठ विवाह सोहळे हा मीडियासाठी नेहमीच खमंग विषय राहिला. 27 फेब्रुवारी 1932 ते 23 मार्च 2011 असा या हॉलीवूडचा पडदा गाजवणाऱ्या अभिनेत्रीचा जीवनपट. 79 वर्षांच्या जीवनात तिने चित्रपट, विवाह याचबरोबरच एड्ससारख्या असाध्य रोगाविरुद्ध संशोधन करणाऱ्या संस्थांना मदत केली आणि स्वतःच एड्स रिसर्च फाऊंडेशनही स्थापन केलं.

सिनेकर्तृत्व सिद्ध झाल्यावर ‘डेम’ या पदवीने सन्मान झालेली एलिझाबेथ रोझमन्ड टेलर हिचा जन्म ब्रिटनची राजधानी असलेल्या जगप्रसिद्ध लंडन शहरात झाला. मात्र तिचे आईवडील अमेरिकन असल्याने वयाच्या सातव्या वर्षी ती त्यांच्याबरोबर अमेरिकेला गेली ती कायमचीच. त्यामुळे तिला इंग्लंड आणि अमेरिका या दोन्ही देशांचं नागरिकत्व मिळालं. कालांतराने ती अभिनयाच्या जोरावर तिच्या जीवनातच दंतकथा बनली.

1942 मध्ये लिझला ‘एका चित्रपटात काम मिळालं ते बालकलाकार म्हणून. ती राहत होती ते अमेरिकेतलं लॉस एन्जेलिस शहर म्हणजे हॉलीवूडच्या झगमगाटाने प्रसिद्ध असलेलं. तिथल्या बिनर्ली हिल भागात असलेल्या युनिव्हर्सल स्टुडिओजसाठी प्रसिद्ध. तिथेच अनेक जगप्रसिद्ध चित्रपटाची निर्मिती झाली आणि कलाकारांची कारकीर्द घडली.

थोडय़ाच दिवसांत लिझला ‘मेट्रो गोल्डबिन मायर’ या मोठय़ा चित्रपट कंपनीत काम मिळालं. इंग्रजी चित्रपट पाहणाऱ्यांना चित्रपटाच्या सुरुवातीला ‘मेट्रो गोल्डबिन’चं बोधचिन्ह असलेला सिंह डरकाळी देताना कसा दिसतो ते आठवेल. सुरुवातीला लिझ, मेट्रो गोल्डबिनची खूप लोकप्रिय बालकलाकार म्हणून नावाजली. चित्रपट होता ‘नॅशनल वेल्वेट’. 1950 च्या दशकात, तारुण्यात पदार्पण केलेल्या एलिझाबेथ टेलरच्या सौंदर्याने मात्र हॉलीवूडचा पडदा भारावून गेला. ती कमालीची लोकप्रिय ठरली. तिचे चित्रपट जगभर गाजायला लागले. मुंबईत आम्हीही ते काही वर्षांनी पाहिले.

1950 च्या दशकात प्रसिद्ध मिळत असताना काही भूमिका नाइलाजाने कराव्या लागतात म्हणून लिझने चित्रपट संन्यास घ्यायचा विचार केला, परंतु यशस्वी कारकीर्दीचा आरंभ होत असताना असं काही प्रत्यक्षात आणणं तिला शक्य झालं नाही. हा औढ घटकेचा ‘संन्यास’ संपवून ती पुन्हा पडद्यावर तळपत राहिली ती 1960 पर्यंत.

लिझच्या महत्त्वाच्या चित्रपटांपैकी काही सांगायचे तर ‘कॅट ऑन अ हॉट टिन रूफ’ किंवा ‘सडन्ली लास्ट समर’, ‘क्लिओपात्रा’ वगैरे अनेक. त्यापैकी ‘लास्ट समर’ने तिला उत्तम अभिनेत्री म्हणून ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार मिळावा. ‘बटर फिल्ड’मधली भूमिका तिला स्वतःला भावली नव्हती असं म्हणतात. तरी तिने ती समरसून केली आणि त्याच भूमिकेसाठी तिला पहिलं ‘ऍकॅडेमी’ म्हणजे ‘ऑस्कर ऍवॉर्ड’ मिळालं. 1961 मधल्या ‘क्लिओपात्रा’ या चित्रपटात काम करताना तिचं विख्यात अभिनेता रिचर्ड बर्टन याच्याशी सूत जमलं आणि हॉलीवूडच्या या दिग्गज कलाकारांनी संसार मांडला. मीडियामध्ये त्या दोघांची नावं ‘लिझ आणि डिक’ अशी येऊ लागली. चाहतेही त्यांना आपुलकीच्या नात्याने याच नावांनी ओळखू लागले. त्यांचे दोघांचे व्हीआयपी ‘सॅन्डपायपर’, ‘अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वुल्फ’ हे चित्रपट खूपच गाजले. ‘व्हर्जिनिया वुल्फ’साठी एलिझाबेथ टेलर यांना दुसरं ऑस्कर ऍवॉर्ड मिळालं. जोडीनं चित्रपट आणि संसार करणाऱ्या बर्टन आणि लिझमध्ये दहा वर्षांच्या संसारानंतर वेबनाव झाला, पण तो 1974 मध्ये पण पुन्हा 1975 मध्ये त्यांनी विवाह केला.

दरम्यानच्या काळात 1950 मध्ये कॉनरॅड हिल्टन, 1952 मध्ये मायकेल बिलिंग, 1957 मध्ये माइकल टॉड, 1959 मध्ये एडी फिशर, मग बर्टन सलग दोनदा त्याच्याशी घटस्फोट झाल्यावर 1976 मध्ये जॉन वॉर्मर आणि 1991 मध्ये लॅरी फॉर्टेन्स्की अशा सात नवऱ्यांबरोबरच्या लिझच्या आठ विवाहाची ‘कारकीर्द’ त्यापैकी माइक टॉडच्या मृत्यूमुळे तिने एडीशी विवाह केला होता. या सर्व संसार यात्रेमुळे एलिझाबेथ त्याही कारणासाठी चर्चेत राहिली, मात्र या वादळी लावण्यवती रूपगर्वितेला अभिनयाची तितकीच जाण होती. म्हणूनच तिला 1999 मध्ये ‘अमेरिकन फिक इन्स्टिटय़ूट’ने हॉलीवूडच्या पडद्यावरची सातवी ग्रेटेस्ट अभिनेत्री म्हणून गौरवलं ते सार्थ होतं.